Low Budget Monsoon Trip : अवघ्या 5000 रुपयांत करता येईल मान्सून सफर; देशातील हा ठिकाणे तुमच्यासाठी परफेक्ट
पावसाळ्यात डोंगरांमधून वाहणारे धबधबे, हिरवळांनी नटलेली दरी, ढगांनी भरलेले रस्ते – हे दृश्य म्हणजे जणू पृथ्वीवरील स्वर्गच वाटतो. या ऋतूमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात जायची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. पण प्रवासासाठी खिशाला परवडणारा खर्चही महत्त्वाचा असतो. सुदैवाने भारतात अशी अनेक ठिकाणं आहेत जी तुम्ही अगदी कमी बजेटमध्येही पाहू शकता आणि पावसाचा आनंद मनसोक्त घेऊ शकता. जर तुमचं बजेट ५००० रुपयांच्या आत असेल, तरीही चिंता करण्याची गरज नाही. भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही कमी खर्चात मनसोक्त फिरू शकता. खास करून सोलो ट्रॅव्हलर्स आणि निसर्गप्रेमींसाठी ही ठिकाणं एक पर्वणीच ठरतात. चला या यादीत कोणकोणत्या ठिकाणांचा समावेश आहे ते जाणून घ्या.
आसामच्या ‘या’ गावाला म्हटले जाते ब्लॅक मॅजिकची राजधानी; काय आहे यामागचं रहस्य? ऐकाल तर हैराण व्हाल
लॅन्सडाउन, उत्तराखंड
जर तुम्हाला जुलै महिन्यातच प्रवास करायचा असेल तर उत्तराखंडमधील लॅन्सडाउन एक उत्कृष्ट पर्याय आहे. थोड्या पावसामुळं हे ठिकाण अधिकच सुंदर दिसतं. दिल्लीपासून सुमारे २५० किमी अंतरावर असलेलं हे ठिकाण बसने सहज गाठता येतं. स्थानिक होमस्टे, स्वस्त जेवण आणि निसर्ग सौंदर्य – हे सर्व मिळून दोन ते अडीच हजार रुपयांमध्ये तुम्ही दिल्लीहून लॅन्सडाउनपर्यंतचा प्रवास करू शकता. इथल्या थंड हवामानात हिरवळ आणि ढगांनी भरलेलं आकाश पाहणं ही एक अविस्मरणीय अनुभव असतो.
टेहरी झील, उत्तराखंड
टेहरी झील पाहण्यासाठी सर्वात चांगला काळ म्हणजे मार्च ते जून किंवा सप्टेंबर ते डिसेंबर. या काळात हवामान आल्हाददायक राहतं. तुम्ही येथे बोटिंग, कॅम्पिंग आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता. साहसी प्रवासासाठी हे ठिकाण योग्य असून संपूर्ण खर्च (प्रत्येकी) सुमारे ५००० रुपयांच्या आत बसतो. पावसात झील आणि डोंगर यांचं संमीलन अप्रतिम भासतं.
मांडू, मध्य प्रदेश
मांडू हे मध्य प्रदेशातील ऐतिहासिक व हिरवळाने नटलेलं ठिकाण आहे. येथे तुम्ही जुलै ते मार्च या काळात कधीही जाऊ शकता. पावसाळ्यात मांडूतील प्राचीन राजवाड्यांची शोभा अधिकच खुलते. तुम्ही रेल्वेने येथे सहज पोहोचू शकता. स्थानिक जेवण, होमस्टे आणि स्थलदर्शन यांचा खर्च सुमारे ४५०० रुपयांमध्ये होतो.
भीमताल, उत्तराखंड
नैनीताल प्रसिद्ध असल्याने तिथे गर्दी जास्त असते. पण तुम्हाला शांत, सुंदर आणि गर्दीपासून दूर एखादं ठिकाण पाहायचं असेल तर भीमताल किंवा नौकुचियाताल उत्तम पर्याय आहेत. येथे तुम्ही झीलच्या काठावर वेळ घालवू शकता, बोटिंग आणि ट्रेकिंग करू शकता. पावसात इथली शांतता आणि निसर्ग फारच मनोहारी वाटतो. हे ठिकाण छोट्या हनीमूनसाठीसुद्धा योग्य आहे.
चिखलदरा, महाराष्ट्र
महाराष्ट्रातील खंडाळा, महाबळेश्वर आणि लोणावळा ही पावसाळ्यात प्रसिद्ध पर्यटनस्थळं आहेत. पण कमी खर्चात असेच निसर्गरम्य दृश्य अनुभवायचे असतील तर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा एक उत्तम पर्याय आहे. विदर्भातील हे एकमेव हिल स्टेशन आहे. येथे कॉफी प्लांटेशन, धबधबे आणि डोंगरदऱ्यांचं सौंदर्य पाहायला मिळतं. स्थानिक ट्रेन किंवा बसने तुम्ही आरामात आणि बजेटमध्ये येथे पोहोचू शकता.