फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'हे' मोठे बदल
जगभरात कर्करोगाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे. कॅन्सरचे नाव ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगावर काटा येतो. कारण हा आजार झाल्यानंतर शारीरिक आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर फुफ्फुसांमधील पेशी अनियंत्रित पद्धती वाढू लागतात, ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये कॅन्सरच्या गाठी तयार होऊ लागतात. गाठी झाल्यानंतर योग्य वेळी औषध उपचार करणे आवश्यक आहे. फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची अनेक कारण आहेत. दूषित हवा, धूळ, माती, प्रदूषण आणि दीर्घकाळ विषारी रसायनांच्या संपर्कात आल्यामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात शरीरात कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढू लागल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. फुफ्फुसांचा कर्करोग ‘साइलेंट किलर’सारखा असतो. या आजाराची लक्षणे सुरुवातीला शरीरात दिसून येत नाहीत मात्र शरीरातील अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.
फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर सतत खोकला येऊ लागतो. वारंवार खोकला येऊन आवाज बसण्याची शक्यता असते. फुफ्फुसांमध्ये झालेल्या कॅन्सरच्या गाठींमुळे आणि अनियंत्रित पेशींमुळे वारंवार खोकला येण्यास सुरुवात होते. शरीरात दिसणाऱ्या लक्षणाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
कर्करोग झाल्यानंतर शरीराचे वजन झपाट्याने कमी होऊन जाते. कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता तुमचे वजन कमी होत असेल तर हे धोक्याचे संकेत आहेत. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. याशिवाय अतिशय हलके काम केल्यानंतर तुमच्या शरीरात थकवा जाणवत असेल तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करावे.
फुफ्फुसांचा कर्करोग झाल्यानंतर आवाजात बदल होण्याची शक्यता असते. याशिवाय बोलताना आवाज अचानक जड झाल्यासारखा वाटणे किंवा सतत घरघर होत फुफ्फुसांच्या समस्या उद्भवल्याचे संकेत आहेत. फुफ्फुसांमध्ये वाढलेल्या गाठी आवाजाच्या स्नायूंवर किंवा श्वास नलिकांवर दबाव टाकतात, ज्यामुळे आवाजात बदल होतो.
फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे काय?
फुफ्फुसांचा कर्करोग हा असा आजार आहे जिथे फुफ्फुसांमध्ये असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढतात, क्लीव्हलँड क्लिनिकनुसार, शरीराच्या इतर भागात पसरण्याची शक्यता असते. याचे दोन मुख्य प्रकार आहेत: नॉन-स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर,ज्यामध्ये NSCLC अधिक सामान्य आहे.
फुफ्फुसांचा कर्करोग बरा होऊ शकतो का?
फुफ्फुसाच्या कर्करोगाचे काही प्रकार लवकर निदान झाले आणि त्यावर प्रभावीपणे उपचार केले तर ते बरे होऊ शकतात. तथापि, तज्ञ अनेकदा “उपचार” ऐवजी “माफी” किंवा “रोगाचा कोणताही पुरावा नाही” (NED) सारखे शब्द वापरतात. जर एखादी व्यक्ती पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ माफी किंवा NED मध्ये असेल, तर ती बरी झाली आहे असे मानले जाऊ शकते.
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे आयुर्मान किती असते?
फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांचे आयुर्मान अनेक घटकांवर अवलंबून असते, ज्यामध्ये निदानाच्या वेळी कर्करोगाचा टप्पा, कर्करोगाचा प्रकार आणि रुग्णाचे एकूण आरोग्य यांचा समावेश असतो. काही रुग्ण फुफ्फुसाच्या कर्करोगाने अनेक वर्षे जगू शकतात, तर काहींचे आयुर्मान कमी असू शकते.