तोंडातील बॅक्टेरिया सक्रिय झाल्यानंतर दिसून येतात 'ही' भयानक लक्षणे
प्रत्येक व्यक्तीला कायमच निरोगी जीवन जगायचे असते. निरोगी आरोग्यासाठी सतत जीवनशैलीत बदल केला जातो. पण जीवनशैलीत केलेले चुकीचे बदल आरोग्याला हानी पोहचतात. शरीरात दिसणाऱ्या सामान्य लक्षणांकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण असे केल्यामुळे छोटे आजार गंभीर स्वरूप घेऊन शरीराच्या कार्यात अडथळे आणतात. कोणताही चिकट किंवा कडक पदार्थ खाल्यानंतर काहींच्या हिरड्यांमधून लगेच रक्त येणे किंवा हिरड्या सुजतात. हिरड्यांमधून येणारे रक्त सामान्य समस्या नसून गंभीर आजाराचे संकेत आहेत. हिरड्यांमधून रक्त येणे, हिरड्या सुजल्यानंतर दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
हिरड्यांमधून येणारे रक्त किंवा हिरड्यांना सूज येण्यामागील प्रमुख कारण म्हणजे तोंडातील बॅक्टेरिया सक्रिय होणे. तोंडात बॅक्टेरिया वाढल्यानंतर हिरड्यांमधून सूज येणे, दातांवर पिवळेपणा वाढणे, तोंडातून दुर्गंधी येणे इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसून येतात. हॉर्वर्ड हेल्थच्या अहवालानुसार, तोंडातील बॅक्टेरिया जर जास्त वेळ सक्रिय राहिल्यामुळे शरीरात सूज वाढून हृदयरोगाचा धोका वाढण्याची शक्यता असते.हिरड्यांना सूज आल्यानंतर धमण्या कठोर होतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
हिरड्यांना आलेल्या सुजमुळे आणि इन्फेक्शनमुळे शरीराच्या कोणत्याही अवयवाला सूज येण्याची शक्यता असते. तोंडात वाढलेले हानिकारक विषाणू रक्तामध्ये मिक्स होतात. रक्तामध्ये मिक्स झालेले विषाणू शरीराची रोगप्रतिकारशक्ती पूर्णपणे कमकुवत करून टाकतात. रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्यामुळे धमण्यांना सूज येण्याची शक्यता असते. ही सूज प्लाक बनून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करते. ज्यामुळे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
हिरड्यांसंबंधित आजार वाढू लागल्यानंतर शरीरात अतिशय सामान्य लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. ब्रश करताना दातांमधून येणारे रक्त, हिरड्यांमध्ये वेदना आणि सूज, श्वासाची दुर्गंधी, दात सैल होणे किंवा हिरड्या मागे सरकणे इत्यादी अनेक लक्षणे दिसून येतात. या लक्षणांकडे अधिक काळ दुर्लक्ष केल्यास जिंजिवायटिस किंवा पीरियोडोंटायटिस होण्याची भीती असते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
आई वडिलांना मधुमेह आहे? आतापासूनच राहा सावधान! पण का?… वाचा
हिरड्यांचे आजार म्हणजे काय?
हिरड्यांचे आजार, ज्याला पिरियडॉन्टल रोग देखील म्हणतात, हा दातांच्या सभोवतालच्या ऊतींचा संसर्ग आहे. हा आजार दातांना आधार देणाऱ्या ऊतींवर परिणाम करतो आणि योग्य उपचार न झाल्यास दात गळू शकतात.
हिरड्यांच्या आजाराचे मुख्य कारण काय आहे?
हिरड्यांच्या आजाराचे मुख्य कारण म्हणजे दातांवर साठलेला प्लेक आणि टार्टर. प्लेकमध्ये बॅक्टेरिया असतात आणि ते जर योग्यरित्या स्वच्छ केले नाही, तर ते टार्टरमध्ये रूपांतरित होतात, ज्यामुळे हिरड्यांना सूज येते.
हिरड्यांच्या आजाराने मधुमेह असलेल्या व्यक्तींवर काय परिणाम होतो?
मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो आणि हिरड्यांच्या आजाराची शक्यता वाढते. मधुमेही व्यक्तींमध्ये हिरड्यांचे आजार अधिक गंभीर असू शकतात.