माधुरी दीक्षितचा क्लासी लुक
बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या सौंदर्याचे आजही लोक वेडे आहेत. वाढत्या वयातही ही सौंदर्यवती आपल्या स्टाईलने आणि फॅशनने चाहत्यांची मने जिंकताना दिसून येते. तर तरुण अभिनेत्रीही तिच्या स्टाइलसमोर नक्कीच पाणी भरतात असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. 57 वर्षांच्या सौंदर्यावती माधुरीची स्टाईल विशेषत: साडीमध्ये आश्चर्यकारक आहे. त्याचा पुरावा नुकताच पाहायला मिळाला. मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला ती पिवळी साडी नेसून पोहोचली.
माधुरीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यामध्ये फ्लोरल प्रिंटेड बनारसी साडी नेसलेली माधुरी खूपच सुंदर दिसत होती, तिच्या चेहऱ्यावरील चमक इतकी होती की कोणाचीही नजर हटली नाही. तिचा हा जबरदस्त अवतार तुम्हालाही खूप आवडेल. तिला पाहणारा कोणीही तिच्या सौंदर्याने थक्क होईल. पाहा माधुरीचा हा क्लासी रॉयल लुक (फोटो सौजन्य – Instagram)
अनिता डोंगरेने डिझाईन केली साडी
माधुरीची डिझाईन्ड साडी
अनेकदा तिच्या साडीच्या लुकने चाहत्यांची मने जिंकणारी माधुरी यावेळी अनिता डोंगरेच्या हाताने विणलेली बनारसी सिल्क साडी परिधान करताना दिसली. ही पिवळ्या रंगाची साडी खूपच आकर्षक आणि मनमोहक आहे. यावर संपूर्ण फ्लोरल प्रिंट करण्यात आली असून त्याची रंगसंगती डोळ्यांना अधिक भावतेय आणि त्यावर माधुरीच्या हास्याने चारचाँद लावले आहेत.
माधुरी दीक्षितलाही करावा लागला होता बॉडी शेमिंगचा सामना, स्वतःच सांगितला किस्सा
अशी आहे साडी स्टाईल
साडीचा क्लासी लुक
पिवळ्या साडीवर केशरी, गुलाबी, हिरवा आणि सोनेरी रंगांचा फ्लॉवर पॅटर्न आहे. जे सोनेरी आणि सिक्विन तारांच्या फुलांच्या बॉर्डरने सजवलेले आहे. त्याच वेळी पदराच्या खालच्या भागावर तारे लावल्याने त्याला एक सुंदर देखावा आला. ज्यामध्ये हिरव्या रंगाचे धाग्याचे लटकन जोडलेले आहे, जो तिने स्लीव्हलेस पिवळ्या प्लेन ब्लाउजसोबत पेअर केला होता.
साडीची किंमत
साडीची किंमत वाचून फुटेल घाम
या फ्लोरल प्रिंटेड बनारसी साडीची किंमत इंटरनेटनुसार किंमत 1,10,000 ते 1,30,500 रुपये आहे. अर्थात ही किंमत सर्वसामान्यांना परवडणारी नसली तरीही अशा स्वरूपाच्या वा अशा डिझाईन्सच्या साड्या नक्कीच मार्केटमध्ये दिसून येतील. सेलिब्रिटी स्टायलिस्ट सुकृती ग्रोव्हरने माधुरीचा हा लुक स्टाईल केला आहे. तिचा हा लुक आणि स्टाईल सर्वांचीच मनं जिंकून घेत आहेत. मराठमोळ्या माधुरीचा हा लुक तुम्हीही कॅरी करू शकता.
दागिन्यांची भर आणि हेअरस्टाईल
कुंदन ज्वेलरीची स्टाईल
माधुरीने राजवाडा ज्वेल्स घालत तिच्या रूपात अधिक सुंदरतेची भर घातल्याचे दिसून येत आहे. तिने जास्त दागिने घातले नव्हते, पण तिचे कुंदनचे कानातले असोत किंवा अंगठ्या आणि बांगड्या, सर्व काही परफेक्ट दिसत होते. त्याचबरोबर पांढऱ्या मोत्याच्या बांगड्याही सुंदर दिसत होत्या. तर दागिन्यांसह तिने सुंदरशी आंबाड्याची हेअरस्टाईल करत त्यात पांढऱ्या पिवळ्या फुलांचा गजरा माळत ही स्टाईल पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले
माधुरी दीक्षित आणि श्रीदेवीचं नातं कसं होतं ? स्वत: माधुरीने केला खुलासा
ग्लोईंग मेकअप लुक
परफेक्ट मेकअप स्टाईल
आता जर आपण माधुरीच्या मेकअपबद्दल बोललो, तर गुलाबी ओठांसह ब्राऊनी शिमरी आय शॅडो, विंग्ड आयलायनर, अधिक मस्करा आणि हायलाईट केलेले गाल यामुळे चेहऱ्यावर चमक आली होती. तर कपाळावर लहान लाल टिकलीही अप्रतिम दिसत होती. यासह तिने ओठांवर ग्लोईंग लिपस्टिक लावली होती.