Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Din 2026 : खास दिनाचा गोडवा वाढवा, यावेळी विकत नाही घरीच ताज्या आंब्यांपासून सर्वांच्या आवडीचा ‘आम्रखंड’

Aamrakhand Recipe : तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीच ताज्या आंब्यांपासून गोड, सुगंधित आणि चवदार असा आम्रखंड तयार करु शकता. महाराष्ट्र दिनानिमित्त ही रेसिपी घरी नक्का ट्राय करा.

  • By नुपूर भगत
Updated On: May 01, 2026 | 08:15 PM
Maharashtra Din 2026 : खास दिनाचा गोडवा वाढवा, यावेळी विकत नाही घरीच ताज्या आंब्यांपासून सर्वांच्या आवडीचा 'आम्रखंड'

Maharashtra Din 2026 : खास दिनाचा गोडवा वाढवा, यावेळी विकत नाही घरीच ताज्या आंब्यांपासून सर्वांच्या आवडीचा 'आम्रखंड'

Follow Us
Follow Us:
  • उन्हाळा म्हणजे आंब्याचा सीजन.
  • आंब्याच्या या मोसमात तुम्ही एकदा तरी घरी आंब्रखंड बनवायलाच हवा.
  • याची रेसिपी फार सोपी आहे.
उन्हाळा सुरू झाला की आंब्याचा सुवास प्रत्येक घरात दरवळू लागतो. आंब्यापासून बनणारे विविध पदार्थ आपल्या जेवणाला खास चव देतात, त्यात आंब्रखंड हा एक अतिशय लोकप्रिय आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे. श्रीखंडाची मऊ, गोडसर चव आणि आंब्याचा ताजा, रसाळ गोडवा यांचा सुंदर मिलाफ म्हणजे आंब्रखंड. हा पदार्थ विशेष प्रसंगी, सणासुदीला किंवा पाहुण्यांसाठीही उत्तम पर्याय ठरतो.

Recipe : ट्रॉपिकल सुगंधाने भरपूर… नारळ, अननस आणि केळीपासून बनवा टेस्टी ‘हवाईन ब्रेड’

आंब्रखंड बनवायला खूप अवघड नाही, पण त्यासाठी योग्य घटक आणि थोडे संयम आवश्यक असतो. घरच्या घरी बनवलेला आंब्रखंड बाजारातील पदार्थांपेक्षा अधिक ताजा, चविष्ट आणि शुद्ध असतो. खास करून पिकलेल्या गोड आंब्यांचा वापर केल्यास या पदार्थाची चव आणखी खुलते. तसेच, यात वापरलेले घटक आरोग्यासाठीही चांगले असतात, त्यामुळे हा गोड पदार्थ तुम्ही निर्धास्तपणे घरच्यांसोबत आनंदाने खाऊ शकता. चला आंब्यांपासून घरच्या घरी रुचकर चवीचा आम्रखंड कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • दही – २ कप (घट्ट)
  • पिकलेला आंबा – १ कप (गर)
  • साखर – ½ ते ¾ कप (चवीनुसार)
  • वेलची पूड – ½ टीस्पून
  • केशर – काही काड्या (ऐच्छिक)
  • दूध – २ टेबलस्पून (केशर भिजवण्यासाठी)
  • सुकामेवा (बदाम, पिस्ते) – सजावटीसाठी
मासे प्रेमींसाठी खास! तंदुरशिवाय घरी बनवा स्मोकी आणि मसालेदार ‘तंदूर प्रॉन्स’, चव जी नेहमीच लक्षात राहिल…

कृती

  • सर्वप्रथम दही स्वच्छ कापडात बांधून ५-६ तास किंवा रात्रभर टांगून ठेवा, जेणेकरून त्यातील पाणी पूर्ण निघून जाईल आणि चक्का तयार होईल.
  • दुसरीकडे केशरच्या काही कड्या थोड्या कोमट दुधात भिजवून ठेवा.
  • एका भांड्यात तयार चक्का घ्या आणि तो चांगला मऊ व गुळगुळीत होईपर्यंत फेटा.
  • आता त्यात आंब्याचा गर आणि साखर घालून नीट मिसळा.
  • नंतर वेलची पूड आणि भिजवलेले केशर घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करा.
  • तयार आंब्रखंड १-२ तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  • शेवटी सर्व्ह करताना वरून सुकामेवा घालून सजवा.
  • तयार आम्रखंड गरमा गरम पुऱ्यांसोबत चवीला फार छान लागेल.
 

Web Title: Maharashtra din 2026 make tasty and sweet aamrakhand at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • marathi recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
2

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.