Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’

शिवजयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र पर्यटन विभागाने 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६' ची घोषणा केली आहे. हा तीन दिवसीय महोत्सव दि. १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 16, 2026 | 09:24 PM
शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६'

शिवजन्मोत्सवाचा जल्लोष! पर्यटन विभागाच्या वतीने शिवनेरीवर रंगणार 'हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६'

Follow Us
Close
Follow Us:
  • शिवजयंती निमित्त महाराष्ट्र पर्यटन विभागाची मोठी घोषणा
  • ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’ ची घोषणा
  • ही तीन दिवसीय महोत्सव दि. १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान असणार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन जन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव : हिंदवी स्वराज्य महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाच्या मैदानावर हा तीन दिवसीय महोत्सव रंगणार आहे. पुणे जिल्हा प्रशासन आणि राज्याच्या पर्यटन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून, शिवकालीन इतिहास, संस्कृती आणि लोकपरंपरांना उजाळा देणारे विविध कार्यक्रम सादर केले जाणार आहेत.

Ahilyanagar News: राहता आणि शिर्डीत नवनवीन इमारती उभ्या? मात्र, पोलीस बळाचे काय?

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राष्ट्राचे प्रेरणास्थान असून त्यांच्या जन्मस्थानी हा महोत्सव साजरा करणे ही अभिमानाची बाब आहे. या उपक्रमातून शिवकालीन विचार आणि संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होणार असून, पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले की, महोत्सवाचे स्वरूप सर्वसमावेशक असून पारंपरिक कला, लोककला आणि स्थानिक उपक्रमांना व्यासपीठ दिले जाणार आहे. पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी सांगितले की, स्थानिक कला, खेळ आणि संस्कृतीचे संवर्धन हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. शिवभक्त आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

स्वराज्य म्हणजे काय? हर्षवर्धन सपकाळांच्या लेकीने ट्रोलर्सना शिकवला धडा; वडिलांवरील टीकेला दिले चोख प्रत्युत्तर

तीन दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल

१७ फेब्रुवारी रोजी उद्घाटन सोहळ्यानंतर लोकगीतांवर आधारित ‘द फोक आख्यान’, कबड्डी स्पर्धा, बैलगाडा शर्यत, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि खाद्य महोत्सव हे आकर्षण ठरणार आहेत.

१८ फेब्रुवारी रोजी बैलगाडा शर्यत, लोककला सादरीकरण, केसरी कुस्ती स्पर्धा, शिवाजी महाराजांना मानवंदना आणि ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.

१९ फेब्रुवारी रोजी शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण, महिला बचत गटांचे प्रदर्शन आणि सायंकाळी भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. महाआरती आणि बहुरंगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी महोत्सवाची सांगता होणार आहे.

राज्याच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकारातून आयोजित या ऐतिहासिक सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Maharashtra tourism announced hindavi swarajya mahotsav 2026 at shivneri occasion of shivjayanti 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Shambhraj Desai
  • shivjayanti

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.