उजळदार त्वचेसाठी बेसनाचा 'या' पद्धतीने करा वापर
देशभरात सगळीकडे 14 जानेवारीला मोठ्या आनंदात आणि उत्साहात मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो. संक्रांतीच्या दिवशी तीळ गूळ वाटण्याची परंपरा आहे. शिवाय अनेक घरांमध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी हळदीकुंकू ठेवले जाते. सणावाराच्या दिवसांमध्ये महिला छान नटून थटून तयार होतात. सुंदर काळ्या रंगाची साडी नेसून त्यावर हलव्याचे( तिळगुळाचे) दागिने परिधान केले जातात. हळदीकुंकूमध्ये त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी महिला काहींना काही करतात. पार्लरमध्ये जाणून फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जाते. पण अनेकदा कामाच्या धावपळीमध्ये पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरच्या घरी फेशिअल करू शकता.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचा सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या अधिक उठावदार आणि सुंदर दिसते. चला तर जाणून घेऊया बेसनाचा वापर करून होममेड फेशिअल करण्याची सोपी कृती.
बेसनाचा वापर करून तुम्ही त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवू शकता. शिवाय यामुळे तुमच्या त्वचेला कोणतेही इन्फेक्शन होणार नाही. त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. त्वचा उजळ्वण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर तीन पद्धतीने करू शकता. चला तर जाणून घेऊया बेसनाचा वापर कशाप्रकारे करावा.
ब्लिचिंग केल्याप्रमाणे त्वचेवरील चमक वाढण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये २ चमचे बेसन पीठ घेऊन त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात कच्चे दूध टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करा. तयार केलेला लेप त्वचेवर लावून 15 ते 20 मिनिटं होईपर्यंत तसाच ठेवून द्या. त्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील घाण स्वच्छ होऊन त्वचा अधिक चमकदार आणि सुंदर दिसेल. त्वचेसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही बेसनाचा वापर करू शकता.
वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात 2 चमचे दही टाकून जाडसर पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करून झाल्यानंतर संपूर्ण त्वचेवर आणि मानेवर लावा. यामुळे त्वचेवरील चमक पुन्हा परत येईल. 20 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. त्वचेवरील सर्व पिंपल्सचे डाग निघून जातील. या पद्धतीने त्वचेवर फेशिअल केल्यास डेडस्किन आणि टॅनिंग निघून जाईल.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेवरील पिगमेंटेशन, डार्क स्पॉट कायमचे काढून टाकण्यासाठी वाटीमध्ये एक चमचा बेसन घेऊन त्यात चंदन पावडर आणि 1 चमचा तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात हळद टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात चमचाभर दही टाकून मिक्स करा. लेप लावून झाल्यानंतर 20 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या.