त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय
थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. याशिवाय त्वचेच्या साली निघणे, त्वचा कोरडी पडणे, त्वचेवर भेगा पडणे, सुरकुत्या येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा त्वचा आणखीनच जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेवर थंडीच्या दिवसांमध्ये सुरकुत्या दिसू लागतात. या सुरकुत्या दिसू नयेत म्हणून अनेक महिला मेकअप करतात. मात्र मेकअप सुद्धा त्वचेवरील सुरकुत्या लावपता येत नाहीत. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेमधील ओलावा कमी होऊन जातो. शिवाय त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसते. अशावेळी त्वचेवर माॅईश्चराईज लावून त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – iStock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट किंवा फेशिअल करून पाहतात. मात्र यामुळे त्वचेचा काही दिवस सुंदर आणि चमकदार दिसते. पण कालातंराने त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाते. त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता कायम टिकून राहते. शिवाय त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. आज आम्ही तुम्हाला कमी वयात त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरच्या घरी स्क्रब तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे त्वचेला अनेक फायदे होतील.
त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर केल्यास त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा माॅईश्चराईज ठेवणे आवश्यक आहे. घरातील पदार्थांचा वापर करून स्क्रब तयार करण्याची सोपी कृती.
घरगुती स्क्रब त्यर्व करण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात तांदूळ आणि मसूर ची डाळ घेऊन बारीक पावडर तयार करा. तयार केलेली पावडर १ चमचा वाटीमध्ये घेऊन त्यात हळद, मुलतानी माती आणि बेसन टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर त्यात मध आणि दही त्याकुन घट्टसर मिश्रण तयार करा. तयार केलेले मिश्रण तुम्ही संपूर्ण अंगाला सुद्धा लावू शकता.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
तयार केलेला स्क्रब त्वचेवर आणि मानेवर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसेल. 10 मिनिटं ठेवल्यानंतर पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्यास त्वचा चमकदार आणि सुंदर होईल.