केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय
सर्वच महिला केसांच्या आरोग्याची काळजी घेतात. मात्र वाढलेले प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, आहारात पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. केसांच्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी न घेतल्यास केसांची वाढ होत नाही शिवाय केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. थंडीच्या दिवसांमध्ये अनेक महिला वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करतात. यामुळे केस सुंदर आणि चमकदार दिसतात. मात्र कालांतराने पुन्हा एकदा केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे दैनंदिन वापरात केसांच्या वाढीसाठी केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर न करता केसांना सूट होईल अशा प्रॉडक्टचा वापर करावा. यामुळे केसांची वाढ निरोगी होते आणि केस सुंदर दिसतात.(फोटो सौजन्य – iStock)
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
थंडीच्या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केसांची वाढ थांबणे इत्यादी अनेक अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करतात. मात्र असे करण्याऐवजी केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांवर कोणते पदार्थ वापरावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
कांद्याच्या रसात असलेले गुणधर्म केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर आहेत. कांद्याचा रस केसांना लावल्यामुळे केस लांबलचक आणि सुंदर दिसतात. यासाठी लहानसा कांदा घेऊन किसून घ्या. त्यानंतर त्यातील रस काढून टाळूवर 15 मिनिटं लावून ठेवा. त्यानंतर केस शॅम्पूने स्वच्छ धुवा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल. हा उपाय आठवड्यातून दोनदा केल्यास केसांची वाढ चांगली होईल.
मागील अनेक वर्षांपासून खोबऱ्याच्या तेलाचा वापर केस आणि त्वचेसाठी केला जात आहे. या तेलाच्या वापरामुळे केस चमकदार आणि सुंदर होतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केसांना खोबऱ्याचे तेल लावावे. यामध्ये असलेले प्रोटीन आणि मिनरल्स केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. यामुळे केस गळतीचे प्रमाण थांबते. यासाठी खोबऱ्याचे तेल कोमट करून टाळूपासून केसांच्या टोकांपर्यंत सगळीकडे व्यवस्थित लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. त्यानंतर केस 1 तास तसेच ठेवून नंतर शॅम्पूच्या सहाय्याने केस स्वच्छ धुवा.
लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा
जास्वंदीची फुले केसांना पोषण देतात. यासाठी जास्वंदीची फुले खोबऱ्याचे तेल टाकून व्यवस्थित गरम करून घ्या. त्यानंतर तेल कोमट करून संपूर्ण केसांवर लावून रात्रभर तसेच ठेवा. यामुळे केसांची वाढ चांगली होईल आणि केस तुटणार नाहीत. शिवाय घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये जास्वंदीच्या फुलांचा हेअर मास्क सुद्धा बनवू शकता.