सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मूग डाळ टोस्ट
रोजच्या जेवणात मूग डाळीचा वापर केला जातो. मूगडाळीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ आरोग्यसाठी फायदेशीर असतात. मूग डाळ पचायला हलकी असल्याने आजारी पडल्यानंतर अनेकदा मूग डाळीपासून बनवलेले वरण जेवणात दिले जाते. सकाळच्या नाश्त्यासाठी नेमका काय पदार्थ बनवायचा हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अनेकदा मुलं त्यांच्या आवडीचा नाश्ता नसला तरनाश्ताच करत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना मूग डाळीपासून बनवलेला टोस्ट नाश्त्यासाठी देऊ शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडेल. चला तर जाणून घेऊया मूग डाळ टोस्ट बनवायची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: भारताचा ‘हा’ पदार्थ जगामध्ये टॉप १० च्या यादीत! इतर तीन पदार्थांचा समावेश