सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गुळाचे पोहे
मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. हा आजार झाल्यानंतर खाण्यापिण्याची पथ्य पाळावी लागतात. त्यामुळे सकाळीच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थाचे सेवन करावे असा प्रश्न पडतो. रक्तातील साखर वाढू नये म्हणून गोड पदार्थ खाणे टाळले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी गुळाचे पोहे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमी वेळात सुद्धा तयार करू शकता. गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही. नाश्त्यामध्ये मसालेदार तिखट पदार्थ खाण्याऐवजी चवीला गोड आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावे, जेणेकरून आरोग्यसंबंधित समस्या उद्भवणार नाहीत. चला तर जाऊन घेऊया गुळाचे पोहे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मूग डाळ टोस्ट, वाचा सोपी रेसिपी