Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा ‘रताळ्याचा हलवा’

Sweet Potato Halwa : हिवाळ्याच्या दिवसांत रताळे बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात. थंडीच्या वातावरणात याचे सेवन आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते अशात तुम्ही यापासून गोडसर आणि चविष्ट असा हलवा तयार करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 08, 2025 | 09:15 AM
Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा 'रताळ्याचा हलवा'

Recipe : गोड खा पण शुगरची चिंता सोडा, विनसाखर अशाप्रकारे बनवा 'रताळ्याचा हलवा'

Follow Us
Follow Us:
  • थंडीच्या दिवसांत रताळे भरपूर्ण खाल्ले जातात
  • रताळे भाजून किंवा उकडून खाण्याऐवजी तुम्ही यापासून चविष्ट असा हलवा तयार करू शकता
  • हा हलवा पौष्टिक ठरेल कारण यात साखरेचा नाही तर गुळाचा वापर केला जाणार आहे
रताळे ही अशी गोष्ट आहे जी भारतीय घरांमध्ये उपवासापासून दैनंदिन जेवणापर्यंत कुठेही वापरली जाते. थंडीत शरीराला गरम ठेवण्यासाठी आणि झटपट ऊर्जा देण्यासाठी रताळ्यापेक्षा उत्तम पर्याय नाही. त्यात भर म्हणजे त्यापासून बनलेला हलवा मऊ, सुगंधी आणि अतिशय स्वादिष्ट! रताळ्याचा हलवा बनवायला सोपा असून त्यात फार कमी साहित्य लागते. सण, पाहुणे किंवा अचानक गोड खायची इच्छा… अशावेळी झटपट हा हलवा बनवता येतो. उकडलेल्या रताळ्याची नैसर्गिक गोडी, तुपाचा मोहक सुगंध आणि गुळाची चव यामुळे हा हलवा कुणालाही लगेच आवडतो. आज आपण साखरेचा वापर न करता रताळ्याचा हलवा कसा तयार करायचा याची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी जाणून घेणार आहोत.

Sankashti Special : तेच तेच बोरिंग पदार्थ सोडा, यंदा उपवासाला बनवा टेस्टी बटाटा पॅटिस 

साहित्य

  • रताळे – ३ मोठे
  • तूप – २ ते ३ टेबलस्पून
  • दूध – १ कप
  • गूळ – ½ कप (किसलेला)
  • वेलदोडा पावडर – ¼ टीस्पून
  • काजू – ८ ते १०
  • बदाम – ८ ते १०
कृती
  • सर्वप्रथम रताळे व स्वच्छ धुवून घ्या. नंतर प्रेशर कुकरमध्ये किंवा भांड्यात मऊ होईपर्यंत उकळून घ्या. उकडल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्या आणि त्याची साल काढा.
  • उकडलेले रताळे एका भांड्यात छान मॅश करून घ्या. कढई गरम करून त्यात एक चमचा तूप घाला. तूप गरम झाले की काजू-बदाम हलके सोनेरी होईपर्यंत परतून एक ताटात काढून ठेवा.
  • आता त्याच कढईत थोडे अजून तूप घाला आणि मॅश केलेले रताळे टाका. सतत ढवळत २–३ मिनिटे परता. मग त्यात दूध घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजू द्या.
  • मिश्रण घट्ट झाल्यावर किसलेला गूळ आणि वेलदोडा पावडर घाला. गूळ पूर्ण वितळेपर्यंत आणि हलवा
  • चमच्याला सुटेपर्यंत शिजवा. शेवटी भाजलेले काजू-बदाम घालून हलक्या हाताने मिसळा.
  • गरमागरम, सुगंधी रताळ्याचा हलवा पाहुण्यांना किंवा कुटुंबाला सर्व्ह करा.
संध्याकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी Mushroom Toast, प्रोटीनयुक्त पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल

रताळ्याचे फायदे :

  • रताळ्यामध्ये व्हिटॅमिन ए (बीटा-कॅरोटीन), व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळून येते.
  • यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि फायबर पोट भरलेले ठेवते.
  • याचे सेवन रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत करते, जे हृदयासाठी चांगले आहे.
  • व्यायामापूर्वी रताळे खाल्ल्यास भरपूर ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
  • यातील बीटा-कॅरोटीन डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.

Web Title: Make tasty sweet potato halwa without sugar recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 07, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • marathi recipe
  • sweet dish
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
1

१५ मिनिटांमध्ये श्रावण सोमवारच्या नैवैद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा गव्हाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
2

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल
4

भाजी काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा झणझणीत राजस्थानी ‘डुमरी तडका चटणी’, एकदा खाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.