संध्याकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा हेल्दी टेस्टी Mushroom Toast
संध्याकाळच्या वेळी प्रत्येकाला काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर नेहमीच बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. सामोसा, शेवपुरी, चाट, वडापाव, भजी इत्यादी अनेक पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट आणि तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात कायमच घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मशरूम टोस्ट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. बाजारात कायमच मशरूम उपलब्ध असतात. आरोग्यासाठी मशरूम सुपरफूड मानले जाते. यामध्ये असलेले प्रथिने शरीरातील हाडे मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी मशरूमचे सेवन करावे. मशरूमची चव पाणचट असते, त्यामुळे मशरूम खाण्यास लहान मुलं कायमच नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी मशरूम टोस्ट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मशरूम टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)






