Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Roti Frankie Recipe : तुम्हीही शिळ्या झालेल्या चपात्या दुसऱ्या दिवशी फेकत असाल तर तुम्ही मोठी चूक करत आहात. शिळ्या चपात्या फेकून न देता यापासून तुम्ही लहान मुलांच्या आवडीची चविष्ट फ्रँकी तयार करु शकता. यामुळे अन्नाचा अपव्यय देखील होणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2026 | 10:03 AM
Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Follow Us
Follow Us:
  • अनेकदा असं घडतं की, घरी जेवणानंतर काही एस्ट्रा चपात्या शिल्लक राहतात.
  • या चपात्या पुन्हा खाण्याचा कंटाळा करुन त्या बऱ्याचदा फेकून दिल्या जातात.
  • पण तुम्ही यांचा वापर करुन शिळ्या चपात्यांपासून नवीन पदार्थ तयार करु शकता.
रोजच्या जेवणानंतर चपाती उरली की ती दुसऱ्या दिवशी कशी वापरायची, हा प्रश्न अनेकदा पडतो. उरलेली चपाती पुन्हा गरम करून खाण्याऐवजी त्यापासून चटपटीत आणि स्वादिष्ट फ्रँकी तयार करता येते. बाजारात मिळणाऱ्या स्ट्रीट स्टाईल फ्रँकीसारखी चव घरच्या घरी मिळवण्यासाठी फक्त योग्य मसाले, ताज्या भाज्या आणि चटणीचा वापर करणे महत्त्वाचे आहे. उरलेल्या चपातीचा बेस तयार असल्यामुळे ही रेसिपी वेळही वाचवते. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठीही हा चपाती फ्रँकीचा पर्याय उत्तम ठरू शकतो. त्यात आपल्या आवडीप्रमाणे पनीर, चीज, अंडे किंवा वेगवेगळ्या भाज्याही घालता येतात. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य

  • उरलेल्या चपाती – ४
  • कांदा – १ बारीक चिरलेला
  • शिमला मिरची – १ बारीक चिरलेली
  • गाजर – १ बारीक चिरलेले
  • उकडलेला बटाटा – १
  • कोबी – ½ कप बारीक चिरलेला
  • आले-लसूण पेस्ट – १ चमचा
  • लाल तिखट – ½ चमचा
  • हळद – ¼ चमचा
  • गरम मसाला – ½ चमचा
  • चाट मसाला – ½ चमचा
  • टोमॅटो सॉस – १ चमचा
  • हिरवी चटणी – २ चमचे
  • लिंबाचा रस – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – आवश्यकतेनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर – थोडी
कृती
  • कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घाला. कांदा थोडा परतल्यानंतर शिमला मिरची, गाजर आणि कोबी घालून मध्यम आचेवर भाज्या परता.
  • भाज्या थोड्या मऊ झाल्यावर उकडलेला बटाटा हाताने कुस्करून त्यात घाला. त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि मीठ टाका. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून २ ते ३ मिनिटे परता.
  • आता टोमॅटो सॉस आणि थोडा लिंबाचा रस घालून मिश्रण चांगले ढवळा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करा. फ्रँकीचे सारण फार ओले ठेवू नका.
  • तवा गरम करून त्यावर उरलेली चपाती ठेवा. दोन्ही बाजूंनी हलकी गरम करून घ्या. चपाती जास्त वेळ भाजू नका, अन्यथा ती कडक होऊ शकते.
    गरम चपातीवर हिरवी चटणी पसरवा. त्यावर तयार केलेले भाजीचे सारण मध्यभागी ठेवा. आवडत असल्यास यावर थोडा चाट मसाला किंवा किसलेले चीजही घालू शकता.
  • चपातीच्या दोन्ही बाजू थोड्या आत दुमडून ती घट्ट रोल करा. सारण बाहेर पडणार नाही याची काळजी घ्या. रोलला बटर पेपर किंवा फॉइलमध्ये गुंडाळल्यास तो खाण्यास सोपा होतो.
  • तयार फ्रँकी पुन्हा तव्यावर ठेवून दोन्ही बाजूंनी १-२ मिनिटे हलकी भाजून घ्या. बाहेरून थोडी कुरकुरीत आणि आतून मसालेदार झाल्यावर गरमागरम सर्व्ह करा.

Web Title: Make tasty veg frankie from leftover chapati nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Chapati
  • food recipe
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
1

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
2

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
3

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
4

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.