
गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर
Diwali 2026: दिवाळी सणाला घरात गोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. पण बऱ्याचदा मधुमेह किंवा इतर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण साखरेचा वापर करून बनवलेले गोड पदार्थ खाणे टाळतात. त्यामुळे साखरेचा अजिबात वापर न करता तुम्ही पौष्टिक आणि हेल्दी मखाणा खीर बनवू शकता. या पद्धतीने बनवलेली मखाणा खीर चवीला अतिशय सुंदर लागते आणि मखाणे खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. मखाणे आणि गूळ हे दोन्ही पदार्थ शरीरासाठी फायदेशीर ठरतात. थन्डीच्या दिवसांमध्ये वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता कायम टिकून राहावी, यासाठी मखाणे खाणे उत्तम मानले जाते. चला तर जाणून घेऊया मखाणा खीर बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत