Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ लसूण काळीमिरी टोमॅटो रस्सम नक्की बनवून पाहा

दक्षिण भारतामध्ये मसाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे तिथे बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये काळीमिरी आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2024 | 05:55 PM
दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ लसूण काळीमिरी टोमॅटो रस्सम नक्की बनवून पाहा
Follow Us
Follow Us:

दक्षिण भारतामध्ये टोमॅटो रस्सम हा पदार्थ खूप फेमस आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असलेला पदार्थ रोजच्या जेवणात बनवला जातो. दक्षिण भारतामध्ये रसमचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. त्यामध्ये चिंच रस्सम, लिंबू रस्सम, टोमॅटो रस्सम, मसूर रस्सम यांसारखे अनेक प्रकार बनवले जातात. रस्सम बनवण्यासाठी वापरले जाणारे पदार्थ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आज आम्ही तुम्हाला लसूण काळीमिरी टोमॅटो रस्सम कसे बनवायचे याची रेसिपी सांगणार आहोत. टोमॅटोचा वापर रोजच्या जेवणात केला जातो. टोमॅटोमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. तसेच जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटोची चव आंबट असते कारण त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड आणि मॅलिक ऍसिड असते. जे डोळ्यांच्या आणि हृदयाच्या आरोग्यसाठी फायदेशीर आहे.

भारतीय मसाल्यांमध्ये काळीमिरीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. चवीला तिखट असलेली काळीमिरी आरोग्यासाठी गुणकारी आहे.दक्षिण भारतामध्ये मसाल्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे तिथे बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये काळीमिरी आणि इतर मसाल्यांचा वापर केला जातो. लसूण खाल्ल्याने जेवणाची चव आणि सुगंध वाढतो. त्यामुळे प्रत्येक जेवणाच्या पदार्थांमध्ये लसणीचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया लसूण काळीमिरी रस्सम कसे बनवायचे याची रेसिपी..

साहित्य:

  • टोमॅटो प्युरी
  • लसूण
  • तिखट मसाला
  • चवीनुसार मीठ
  • चिंच
  • मोहरी
  • तेल
  • हळद
  • कढीपत्ता
  • हिंग
  • हिरवी मिरची
[read_also content=”कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवा लेमन आईस टी https://www.navarashtra.com/lifestyle/make-lemon-ice-tea-at-home-in-summer-539524.html”]

कृती:

  • टोमॅटो रस्सम बनवण्यासाठी टोमॅटो स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या. त्यानंतर कुकरच्या भांड्यात टोमॅटोचे तुकडे, हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, आवश्यकतेनुसार पाणी टाकून कुकर बंद करून गॅसवर ठेवा.
  • कुकरच्या ६ ते ७ शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड होण्यासाठी ठेवा.
  • कुकर थंड झाल्यावर टोमॅटोचे मिश्रण मॅश करून बारीक करा.
  • खलबत्यामध्ये ५ ते ६ लसणीच्या पाकळ्या, काळीमिरी, धणे घेऊन बारीक कुटून घ्या.
  • टोप गरम करायला ठेवून त्यात तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, हिंग टाकून फोडणी भाजून घ्या. नंतर त्यात बारीक केलेली लसूण आणि कढीपत्ता टाकून मिक्स करा.
  • फोडणी लालसर झाल्यानंतर त्यात टोमॅटो रस्सम टाकून मिक्स करून घ्या.
  • रस्समला एक उकळी आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ आणि चिंचेचे पाणी टाकून मिक्स करा.
  • रस्समला उकळी आल्यानंतर तयार आहे लसूण काळीमिरी टोमॅटो रस्सम.

Web Title: Make the famous south indian dish garlic black pepper tomato rassam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2024 | 05:55 PM

Topics:  

  • south Indian dish

संबंधित बातम्या

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी
1

South Indian Sambar Recipe: हॉटेलसारखं नाही, अगदी अण्णाच्या हातचं सांबार! घरच्या घरी बनवा ‘ही’ सिक्रेट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.