
मिस युनिव्हर्स ही फक्त एक सौंदर्य स्पर्धा नाही तर, आत्मविश्वास, व्यक्तिमत्व विकास या बाबी देखील तितक्याच महत्वाच्या असतात. मेक्सिकोच्या फ़ातिमा बॉस टाबास्कोने बालपणी आव्हानांचा सामना करत आज इथवर पोहोचली. तिने शिक्षण, फॅशन डिझायनिंग आणि समाजसेवेद्वारे आपली ओळख निर्माण केली.
कुठल्याही ध्येयाची सुरुवात ही शुन्यापासून होते. त्यामुळे सुरुवातीला आलेल्या आव्हानांना सामोरं जाताना धिराने सामोरं जायला हवं. फातिमा म्हणाली की, लहानपणापासूनच ती खूप संवदेनशील आहे. डिस्लेक्सिया नावाच्या आजाराने ती लहानपणीच ग्रासली होती. या आजारात मुलांना लिहिण्या वाचायला खूप त्रास होतो. .या सगळ्यावर तिने मात केली. याच परिस्थितीला चॅलेंज करत प्रयत्न आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तिने यश प्राप्त केलं. तिने अमेरिकेतील व्हरमाँट येथे शिक्षण घेतले आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवले.
जमत नाही म्हणून सोडून देणं सहज सोपं आहे पण येत नाही किंवा अडचणी येऊन देखील सातत्य ठेवणं आणि धडपडणं हे विशेष आहे. फातिमाला डिस्लेक्सिया असून देखील मॅक्सिको सिटीच्या Universidad Iberoamericana मधून तिने फॅशन क्षेत्रातील धडे घेतले. त्यानंतर इटलीच्या NABA मध्ये पुढील शिक्षण घेतलं.
लहानपणापासून संघर्ष पाचवीला पुजला असेल तर आव्हानांची सवय होते. फातिमाचं देखील असंच झालं. आपल्याला एखाद्या गोष्टीचा संघर्ष करावा लागला की दुसऱ्याच्या समस्यांना आपण जास्त समजायला लागतो. असं फातिमाचं देखील झालं. फातिमाने तिच्या संघर्षावरुन आपल्यापेक्षा जास्त त्रासातून जाणाऱ्यांना तिने मदत करण्याचं ठरवलं. फातिमाने कॅन्सरग्रस्त मुलांच्या सेवेत रुजू झालेली. तिने लहान मुलांसाठी खेळणी दिली होती. विविध समाजकार्यात ती सक्रीय देखील होती. आव्हानांना पेलण्याची उमेद असली की अडचणींची भिती वाटत नाही.
आपल्या हक्कासाठी आणि अस्तित्वासाठी भांडायची वेळ आली तर ते देखील करावं. स्वत:च्या हक्कांसाठी आवाज उठवणं म्हणजे आपण स्वत:ला केलेली मदत असते. जिथे चूक तिथे चूकच आणि जिथे बरोबर तिथे बरोबर हे स्वत:ला ठामपणे सांगता आलं की, जगाला आपोआप पटवून देता येतं. कोणतीही गोष्ट साध्य करायचं झालं तर आपल्याला आव्हानांना पेलण्याची आणि सकारात्मक राहण्याची गरज असते. हेच गुण आपवल्याला ध्येयप्राप्तीपर्यंत पोहोचवतात.