(फोटो सौजन्य – istock)
स्वीकारा आणि समजून घ्या
चिंतेवर मात करण्याचे पहिले भा पाऊल म्हणजे ती मान्य करणे, ती लपवण्याऐवजी स्वतःला, हो, चिंता आहे आणि ते ठीक आहे, ज असे सांगणे महत्त्वाचे. स्वीकारल्याने भीती कमी होते आणि मन हलके होते.
श्वसन आणि ध्यान
दीर्घ श्वसनाचे सोपे व्यायाम चिंता कमी करण्यास मदत करतात. खोल श्वास घेतल्याने शरीर शांत होते. ध्यान आणि माइंडफुलनेस तंत्र आज जगभर लोकप्रिय आहेत. मोबाइल ॲप्स किंवा ऑनलाइन क्लासेसमुळे हे शिकणे सोपे झाले आहे.
संतुलित जीवनशैली
चांगला आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम हे मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असणारे घटक आहेत. रोजच्या जीवनात या गोष्टींना फॉलो करून तुम्ही तुमची जीवनशैली सुधारू शकता.
आहार
पोषणयुक्त आहार घ्यावा. यात तुम्ही हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश करू शकता. फळे, भाज्या आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडयुक्त पदार्थ मेंदूसाठी चांगले. कॅफिन आणि साखरेचे जास्त सेवन.
व्यायाम
रोज व्यायाम, योगासने करा. यामुळे सोशल एन्जाइटी दूर करण्यास मदत मिळेल. रोज ३० ते ४५ मिनिटे चालल्याने शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात.
झोप
दररोज किमान सात तासांची चांगली झोप चिंता कमी करण्यास मदत करते. दररोज ७ ते ८ तासांची झोप घ्यावी. झोपण्याआधी मोबाइल, टिव्ही यापासून दूर राहावे.
डिजिटल ताण टाळा
सध्याच्या डिजिटल जगात मोबाईलचा वापर फार वाढला आहे. यामुळे मनावर अतिरिक्त ताण येऊ लागतो. वेळेची नियोजन करा आणि मर्यादित प्रमाणात मोबाईलचा वापर करा.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.






