सकाळी उपाशी पोटी थंड की गरम पाणी प्यावे?
सकाळी गरम की थंड पाणी प्यावे?
दिवसभरात किती लीटर पाणी प्यावे?
गरम पाण्याचे सेवन केल्यास शरीराला होणारे फायदे?
मानवाला जीवन जगण्यासाठी काही मूलभूत गोष्टींची आवश्यकता असते. अन्न, पाणी आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. अन्नपदार्थांचे सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते तर पाण्याचे सेवन केल्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यास मदत होते. त्यामुळे नियमित भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते. किडनी, आतड्या, लिव्हर आणि शरीराच्या इतर अवयवांमध्ये साचून राहिलेली घाण बाहेर काढून टाकण्यासाठी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. दिवसभरात नियमित २ ते ३ लीटर पाण्याचे सेवन करावे. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच दीर्घकाळ निरोगी राहते. कायमच हेल्दी आणि मजबूत राहण्यासाठी अन्नपदार्थांचे सेवन करण्यासोबतच पाणी पिणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. काहींना थंड पाणी पिण्याची सवय असते तर काहींना कोमट किंवा गरम पाणी पिण्याची सवय असते.(फोटो सौजन्य – istock)
दिवसभरात कमी पाण्याचे सेवन केल्यास शरीर डिहायड्रेट होऊन आरोग्यासंबंधित अनेक गंभीर समस्या उद्भवू लागतात. कमी पाण्याच्या सेवनामुळे लघवी करताना वेदना होणे, ऍसिडिटी, डोकेदुखी, थकवा, अशक्तपणा इत्यादी समस्या उद्भवू लागतात. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि शरीर स्वच्छ होते. पण कायमच सगळ्यांना पडणारा प्रश्न म्हणजे उपाशी पोटी कोणत्या पाण्याचे सेवन करावे? थंड की गरम पाणी प्यावे? याबद्दल प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी सविस्तर माहिती सांगणार आहे. चला तर जाणून घेऊया.
प्रसिद्ध योगगुरू आणि लेखिका हंसा योगेंद्र यांनी सांगितल्यानुसार, सकाळी उठल्यानंतर वयस्कर व्यक्तींनी अंदाजे 250 ते 500 मिली पाणी पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे केवळ शरीर हायड्रेटचं नाही तर पचनक्रिया सुधारण्यास सुद्धा मदत होते. पाण्याच्या सेवनामुळे शरीरातील हानिकारक टॉक्सिन बाहेर पडून जातात. यामुळे मन आणि शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते.
योगगुरूनी सांगितल्यानुसार, पाण्याचे तापमान सुद्धा शरीरासाठी गुणकारी ठरते. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणे अतिशय प्रभावी ठरते. तसेच तुम्ही नॉर्मल खोलीमधील तापमानातील पाणी पिऊ शकता. रात्रीच्या झोपेमुळे शरीर हायड्रेट होते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्याचे सेवन करावे.कोमट पाण्याच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांची हालचाल सुलभ होते. पण जर तुम्ही सकाळी उठून थंड पाण्याचे सेवन केले तर पोटाची हालचाल अतिशय मंदावते.
Ans: काहीही खाण्यापूर्वी एक ते दीड तास आधी किंवा जेवणानंतर एक तासाने पाणी पिणे चांगले आहे.
Ans: सामान्य खोलीच्या तापमानाला पाणी पिणे उत्तम आहे.
Ans: शरीरातील प्रत्येक प्रणाली, पेशी आणि अवयवांच्या योग्य कार्यासाठी पाणी आवश्यक आहे.






