
केसांच्या मजबूत वाढीसाठी खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' पदार्थ
पावसाळा सुरु झाल्यानंतर आरोग्यसोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात केस भिजल्यानंतर चिकट आणि तेलकट होऊन जातात. तेलकट झालेले केस स्वच्छ केले नाहीतर केस गळण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात आणि इतर ऋतूंमध्ये केसांची काळजी घेणे आवश्यक आहे. आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावून मसाज करणे,शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवणे, कंडिशनर वापरणे इत्यादी गोष्टी केल्याने केस स्वच्छ होतात. सुंदर नि चमकदार केसांसाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करतो. पण हे उपाय काहीकाळ केसांवर टिकून राहतात.
अनेकदा सतत केस गळल्याने केसांची वाढ पूर्णपणे खुंटली जाते. केस गळून हळूहळू टक्कल पडण्यास सुरुवात होते. टक्कल पडल्यानंतर महिलांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे केसांच्या वाढीसाठी केसांना नियमित खोबऱ्याचे तेल लावावे. खोबऱ्याच्या तेलात विटामिन सी आणि फॅटी ऍसिड असतात. यामुळे नैसर्गिकरित्या केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात हे पदार्थ मिक्स करून तेल तयार करा. हे तेल केसांवर प्रभावी ठरेल.(फोटो सौजन्य-istock)
केसांच्या मजबूत वाढीसाठी खोबरेल तेलात ‘हे’ पदार्थ मिक्स करा
केसांच्या घनदाट वाढीसाठी खोबरेल तेलात मेथी दाणे मिक्स करा. मेथी दाणे टाकून तेल तयार करण्यासाठी टोपात खोबऱ्याचे तेल घेऊन त्यात मेथी दाणे टाकून गरम करून घ्या. तेल थंड झाल्यानंतर कोमट तेलाने केसांना मसाज करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा केल्याने केसांची वाढ होण्यास मदत होईल. मेथी दाण्यांमध्ये प्रोटीन,विटामिन सी असते. यामुळे रक्तभिसरण व्यवस्थित होते.
हे देखील वाचा: पावसाळ्यात रस्त्यावर मिळणारे ‘हे’ स्ट्रीट फूड आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
केसांच्या मजबूत वाढीसाठी खोबरेल तेलात ‘हे’ पदार्थ मिक्स करा
कांद्याचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो असे अनेकांना वाटते. पण केसांच्या मजबूत वाढीसाठी कांद्याचा रस प्रभावी आहे. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळून येतात, जे केसांच्या चमकदार वाढीसाठी मदत करतात. अर्धा वाटी खोबरेल तेल घेऊन त्यात कांद्याचा रस मिक्स करा. हे तेल केसांना लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. यामुळे केसांची मूळ मजबूत होतील.
केसांच्या मजबूत वाढीसाठी खोबरेल तेलात ‘हे’ पदार्थ मिक्स करा
कढीपत्यामध्ये केसांना आवश्यक असलेले सर्व गुणधर्म आहेत. यामध्ये प्रोटीन, बीटा-कॅरोटीन,लोह,जीवनसत्त्वे आढळून येतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. कढीपत्त्याचे तेल तयार करण्यासाठी एक वाटी खोबरेल तेल गरम करून त्यात कढीपत्त्याची पाने भिजत ठेवा. ६ तासानंतर हे तेल केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत सगळीकडे लावा. यामुळे केसांची वाढ होईल.