पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही तिखट झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पाऊस पडल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होतो. या दिवसांमध्ये साथीचे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे फार गरजेचे आहे. पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाण्याची फार इच्छा होते. तेव्हा बाहेर जाऊन स्ट्रीट फूड खाल्ले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणते स्ट्रीट फूड पावसाळ्यात खाऊ नये, याबद्दल सांगणार आहोत. चवीला छान असलेले स्ट्रीट फूड पदार्थ आरोग्यासाठी घातक आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कमीत कमी बाहेरच्या पदार्थांचे सेवन करावे. (फोटो सौजन्य-istock)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये 'हे' स्ट्रीट फूड पदार्थ खाणे टाळा

हल्ली सगळ्यांचं मोमोज खायला आवडतात. बाजारात वेगवेगळे प्रकारचे मोमोज उपलब्ध आहेत. पण पावसाळ्यात मोमोज खाणे टाळावे.स्वच्छतेचा अभाव, अयोग्य हाताळणी इत्यादींमुळे पावसाळ्यात मोमोज खाऊ नये.

जगभरात सगळीकडे पाणीपुरी हा पदार्थ प्रसिद्ध आहे. पाणीमधील तिखट पाणी अनेकांना आवडते. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीपुरी बनवण्यासाठी वापरलेले पाणी स्वच्छ नसेल तर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.

रस्त्याच्या बाजूला छोट्या जागेत अनेक लोक चायनीज पदार्थ बनवून विकतात. पण पावसाळ्यात रस्त्यावर बनवले जाणारे चायनीज खाऊ नये.

दही वडा हा पदार्थ सगळ्यांचं आवडतो. पण पावसाळ्यात हा पदार्थ खाऊ नये. स्ट्रीट फूड म्हणून बाजारात उपलब्ध असलेला दही वडा वातावरणातील आद्रतेमुळे खराब होऊ शकतो.

पावसाळ्यात चाट पदार्थ खायला सगळ्यांचं आवडतात. आलू चाट किंवा इतर चाटमधील पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडू शकते. चाट बनवताना जर स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली नाही तर आरोग्य बिघडू शकते.






