हेअर स्पा करण्याआधी 'या' गोष्टी करू नये
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचेची जशी काळजी घेतली जाते तशीच काळजी केसांची सुद्धा घेतली पाहिजे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांचा परिणाम आपल्या केसांवर लगेच दिसून येतो. या दिवसांमध्ये केस चिकट नि तेलकट होऊन जातात. तेलकट झालेल्या केसांवर कोणतीही हेअरस्टाईल केल्यानंतर केस चांगले दिसत नाही. त्यामुळे आठवड्यातून दोनदा केस स्वच्छ धुतले पाहिजे. केसांच्या मुळांना तेल लावून सकाळी केस स्वच्छ धुवावे, यामुळे केस स्वच्छ राहतात. पाऊस पडल्यानंतर काहीनेचे केस जास्त प्रमाणात गळू लागतात. तसेच केस तुटण्याची शक्यता असते. के तुटू नये म्हणून अनेक महिला हेअर स्पा करतात.हेअर स्पा केल्याने केस लवकर खराब होत नाहीत. पण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हेअर स्पा करताना केसांची कशी काळजी घ्यावी, जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हेअर स्पा करण्याच्या एक दिवस आधी केसांना तेल किंवा कंडिशनर लावू नये. यामुळे हेअर स्पा अधिक काळ केसांमध्ये टिकून राहत नाही. पण जर तुम्ही केसांना तेल किंवा कंडिशनर लावले असेल तर हेअर स्पा एक्सपर्टला नक्की सांगा. असे केल्याने तुमच्या केसांची हानी होणार नाही. हेअर स्पा करत असताना हेअर स्पा व्यतिरिक्त इतर कोणत्याही गोष्टी केसांना लावू नये.
हेअर स्पा करण्याआधी ‘या’ गोष्टी करू नये
हे देखील वाचा: स्मरणशक्ती कमी होत आहे? ‘हे’ 5 चविष्ट ज्यूस वाढवेल तुमची ब्रेन पॉवर
हेअर स्पा केल्यावर या गोष्टी करू नये:
हेअर स्पा केल्यानंतर लगेच केस धुवू नये. तसेच हेअर स्पा केल्यानंतर कोणतेही घरगुती उपाय करू नये. असे केल्यास तुमचे केस खराब होऊ शकतात. केसांवर हीटिंग टूल्सचा वापर करू नये.
केसांसंबधित गंभीर समस्या उद्भवू लागल्यास हेअर स्पा करणे योग्य आहे. हेअर स्पा केल्यानंतर केस गळणे थांबते. त्यामुळे तुम्ही महिन्यातून दोनदा हेअर स्पा करू शकता. हेअर स्पा करण्यासाठी चांगल्या हेअर स्पा सेंटरची निवड करावी.