Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांची खुंटलेली वाढ होईल झपाट्याने! वाटीभर दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक आणि मजबूत

केसांची खुंटलेली वाढ पुन्हा नव्याने करण्यासाठी दही हेअर मास्क केसांवर लावावे. याशिवाय त्यात कढीपत्त्याची पाने किंवा मेथी दाणे मिक्स करून लावल्यास टाळूवरील इन्फेक्शन कमी होईल. जाणून घ्या सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 09, 2026 | 09:41 AM
केसांची खुंटलेली वाढ होईल झपाट्याने! वाटीभर दह्याचा 'या' पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक आणि मजबूत

केसांची खुंटलेली वाढ होईल झपाट्याने! वाटीभर दह्याचा 'या' पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक आणि मजबूत

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना कायमच केसांच्या समस्या उद्भवतात. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस तुटणे इत्यादी केसांसंबधित असंख्य समस्या उद्भवू लागतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचा वापर करतात. कधी हेअर केअर रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी केमिकल युक्त शाम्पू लावून केसांची काळजी घेतली जाते. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य ते उपचार करणे आवश्यक आहे. वातावरणात होणारे बदल, धूळ, मातीचा परिणाम केसांच्या वाढीवर लगेच दिसून येतो. त्यामुळे बदलत्या ऋतूनुसार केसांची काळजी घेणे फार आवश्यक आहे. केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे केस खूप जास्त गळतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. कालांतराने केसांमध्ये टक्कल किंवा केस खूप जास्त विरळ झाल्यानंतर केसांची काळजी घेतली जाते.(फोटो सौजन्य – istock)

 PCOD पासून केसांपर्यंत…. महिलांसाठी वरदान आहेत हे ‘लाडू’, रेसिपी नोट करा आणि आजपासूनच खायला सुरुवात करा

केसांची वाढ खुंटल्यानंतर लवकर केस वाढत नाही. केस वाढवण्यासाठी महिला विविध ट्रीटमेंट आणि उपाय करतात. पण याचा फारसा परिणाम केसांच्या वाढीवर दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची खुंटलेली वाढ पुन्हा नव्याने होण्यासाठी वाटीभर दह्याचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दही केस हायड्रेट आणि चमकदार करण्यासाठी मदत करते. केस चमकदार आणि मजबूत होण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. पण फारसा परिणाम दिसून येत नाही. त्याऐवजी घरगुती उपाय करावेत.

केसांच्या वाढीसाठी दही कढीपत्त्याच्या हेअर मास्क:

जेवणाला फोडणी देण्यासाठी कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्याच्या फोडणीमुळे पदार्थाची चव आणि सुगंध वाढतो. तसेच कढीपत्ता केसांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम करतो. त्यामुळे कढीपत्याचा हेअर मास्क आठवड्यातून एकदा केसांवर लावावा. कढीपत्यामध्ये बीटा-कॅरोटीन आणि प्रोटीन युक्त घटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. कढीपत्ता दही हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दही घेऊन त्यात कढीपत्त्याच्या पानांची पेस्ट टाकून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून केसांवर लावा. काहीवेळ ठेवल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे केस झपाट्याने वाढण्यास मदत होईल आणि केस चमकदार होतील.

Hair Care Tips: अभिनेत्री माधुरी दीक्षित केसांना लावते किचनमधील ‘हे’ नैसर्गिक पदार्थ, पहा सुंदर केसांचे ब्युटी सीक्रेट

दही मेथी दाण्यांचा हेअर मास्क:

केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर कायमच केला जातो. मेथी दाणे सर्वच आजारांवर रामबाण उपाय आहेत. केसांची खुंटलेली वाढ पुन्हा होण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. भिजवून घेतलेले मेथी दाणे मिक्सरमध्ये टाकून त्यांची बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये दही मिक्स करून केसांवर लावा. काहीवेळ तसेच ठेवल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे टाळूवर वाढलेला कोंडा किंवा इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल. केसांमधील नैसर्गिक चमक कायम टिकवून ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Stunted hair will grow faster use a bowl of curd in this way hair will be long and strong

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2026 | 09:41 AM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका
1

डोक्यातील उवा आणि लिखांमुळे त्रस्त आहात? अशाप्रकारे घरीच तयार करा औषध आणि मिळवा कायमची सुटका

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब
2

Home Remedies: कोपर आणि गुडघे कायमच काळेकुट दिसतात? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांपासून बनवा नॅचरल स्क्रब

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल
3

भाजीत तेल जास्त झालंय? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून मिनिटांत बाहेर काढा एक्स्ट्रा ऑईल

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम
4

Hair Care Tips: शिल्लक राहिलेल्या जास्वदींच्या फुलांचा वापर करून ‘या’ पद्धतीने बनवा नॅचरल हेअर कंडिशनर, केस होतील मुलायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.