तुमची सुद्धा समरणशक्ती दिवसेंदिवस कमी होत आहे का? जर या प्रश्नाचे उत्तर होय असे असेल तर ही बातमी तुमच्या साठी आहे. रोज कितीतरी लोकं आपली स्मरणशक्ती वाढावी म्हणून वेगवेगळे औषधं खात असतात. पण आज आम्ही तुम्हाला कोणत्या औषधांबद्दल नाही तर काही आरग्यदायी फळांपासून बनलेल्या ज्यूसबद्दल सांगणार आहोत. ज्यूसमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे कॉग्निटिव फंक्शनला सपोर्ट करतात. हे ज्यूस लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत, सर्वेश पिऊ शकतात. पाहूयात कोणत्या ज्यूसचे सेवन तुमची स्मरणशक्ती वाढवेल.
फोटो सौजन्य: Freepik
एका वृत्तपत्रातील माहितीनुसार, ब्लूबेरीचा ज्यूस पिऊन तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता. या फळाला ब्रेन बेरी देखील म्हणतात. त्यात फ्लेव्होनॉइड्ससारखे अँटिऑक्सिडंट असतात जे आपली मेमरी आणि कॉग्निटिव फंक्शन चांगले करतात. ब्ल्यूबेरीचा ज्यूस नियमितपणे प्यायल्याने वृद्धांमधील कॉग्निटिव परफॉर्मेंस सुधारते. यामुळे मेंदूच्या पेशीही निरोगी राहतात.
जेव्हा तुम्ही व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असलेल्या संत्र्याचा ज्यूस पितात तेव्हा तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारते. न्यूरोट्रांसमीटरच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. याशिवाय ब्रेन फॉगची समस्याही दूर होऊ शकते. संत्र्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट मेंदूला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचवतात.
डाळिंबाचा ज्यूस मेंदूच्या आरोग्यासाठीही खूप आरोग्यदायी आहे. यामध्ये पॉलिफेनॉलचे प्रमाण जास्त असते जे स्मरणशक्ती वाढवते. हा ज्यूस नियमितपणे प्यायल्याने स्मरणशक्ती आणि मेंदूची क्रिया सुधारते. हा ज्यूस फक्त मेंदू नाही तर आपल्या शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे.
बीटरूटचा ज्यूस मेंदूलाही निरोगी ठेवतो तसेच हा नियमितपणे प्यायल्यास मेंदूचे कार्य सुधारते. नायट्रेट्सने समृद्ध असलेला हा रस मेंदूतील रक्तप्रवाह वाढवतो, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. रक्तप्रवाह वाढल्यामुळे मेंदूच्या पेशींपर्यंत अधिक ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये पोहोचतात, जे नक्कीच स्मरणशक्ती वाढवते.
द्राक्षाचा ज्यूस फक्त शरीर नव्हे तर मेंदूलाही निरोगी ठेवतो. काळ्या द्राक्षाचा ज्यूस प्यायल्याने मेंदूची कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती वाढते. द्राक्षात रेझवेराट्रोल सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे वृद्धांमध्ये स्मरणशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त असतात. हा ज्यूस प्यायल्याने तुमच्या मेंदूचे न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांपासूनही संरक्षण होऊ शकते.