Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यात या 3 गोष्टी मिसळा, आठवडाभर लादी पुसायचे टेन्शन नाही, जंतूंचाही होईल नायनाट

तुम्हाला माहिती आहे का? लादी पुसायचा पाण्यात काही गोष्टी मिसळून तुम्ही आठवडाभर लादी स्वछ आणि चकचकीत ठेवू शकता. कामाच्या व्यापामुळे आपल्याला रोज रोज लादी पुसायला वेळ मिळत नाही अशात ही घरगुती ट्रिक तुमच्या फार कामी येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 27, 2024 | 06:00 AM
पाण्यात या 3 गोष्टी मिसळा, आठवडाभर लादी पुसायचे टेन्शन नाही, जंतूंचाही होईल नायनाट

पाण्यात या 3 गोष्टी मिसळा, आठवडाभर लादी पुसायचे टेन्शन नाही, जंतूंचाही होईल नायनाट

Follow Us
Close
Follow Us:

घराची स्वछता राखण्यासाठी वेळोवेळी साफसफाई करणे गरजेचे आहे. घरची स्वछता न राखल्यास अनेक जीव-जंतूंचा संभ्रम वाढण्याची शक्यता असते आणि यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी घराची साफसफाई करणे आवश्यक आहे. घरात लहान मुले दिवसभर जमिनीवर बसून खेळत असतात. घरातील सर्वजण दिवसभर इकडे तिकडे फिरत असतात. अशात लादीवर धूळ किंवा जीवजंतू असले तर ते मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकतात.

मात्र अनेकदा कामाच्या व्यापामुळे आपल्याला रोजरोज घरची साफसफाई करणे जमत नाही. आपण वरवर घर आवरतो मात्र दररोज चकचकीत घर साफ करणे काही आपल्याला जमत नाही. अशात आज आम्ही तुमच्यासाठी यावर एक उपाय घेऊन आलो आहोत. या उपायाने तुमचे रोज रोज लादी पुसण्याचे टेन्शन दूर होईल आणि तुमचे घरही स्वछ राहील. या युक्तीने तुम्हाला रोज पुसण्याची गरज भासणार नाही. तसेच तुमच्या घराची फरशी देखील स्वच्छ आणि जंतूमुक्त राहील.

गुलाबजल

जर तुम्हाला दररोजच्या लादी पुसण्याचा समस्येपासून सुटका हवी असेल तर यात गुलाबजल तुमची मदत करू शकते. यासाठी प्रथम अर्धी बादली भरेल एवढे पाणी घ्या. आता यात एक चमचा मीठ टाका. आता यात एक चमचा फिनायल टाका. तसेच यात एक चमचा गुलाबजल टाका. सर्व गोष्टी पाण्यात व्यवस्थित एकत्र करा आणि याने लादी पुसा. याने तुमचे लादी एकदम साफ आणि चकचकीत होईल.

कपूर आणि लवंग

कपूर आणि लवंगदेखील लादी साफ राखण्यास मदत करू शकते. यासाठी 5-6 कपूर घेऊन त्याची बारीक पावडर बनवा. आता ही तयार पावडर लादी पुसायचा पाण्यात टाकून मिसळा. आता लवंग तेल घेऊन पाण्यात मिसळा. तयार झालेल्या पाण्याने लादी स्वछ पुसा. लादी स्वछ ठेवण्यासाठी हा एक उत्तम आणि रामबाण उपाय आहे.

तुरटी

आपल्या घरातील लादीवर अनेक हानिकारक जिवाणू असतात जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही. हे जिवाणू घालवण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी तुरटी फार मदतीची ठरत असते. तुरटीने तुम्ही बाथरूम देखील साफ करू शकता. यासाठी पाण्यात तुरटी पावडर टाकून गरम करा. या पाण्याने तुम्ही वॉश बेसिन, फ्लश, सिंक यांसारख्या अनेक गोष्टी स्वछ करू शकता.

टीप – ही माहिती केवळ वाचनाकरिता देण्यात आली आहे. कोणताही दावा आम्ही करत नाही. संकेतस्थळांवरून अभ्यास करून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती असून वाचकांच्या ज्ञानात अधिक भर घालण्याचा हा प्रयत्न आहे.

Web Title: Mopping hacks put these 3 things in water before mop house to clean floor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2024 | 06:00 AM

Topics:  

  • kitchen tips
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा
1

सूर्याच्या नव्या किरणाने,तुमच्या आजच्या….! दिवसाची सुरुवात आनंदाने जाण्यासाठी नातेवाईकांना पाठवा ‘या’ गोड शुभेच्छा

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास
2

जगातील सगळ्यात पहिले Ice cream कोणी आणि कोणत्या देशात बनवण्यात आले? जाणून घ्या थंडगार आईस्क्रीमचा इतिहास

Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा
3

Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा
4

कालांतराने लोकरीच्या कपड्यांवरील धागे निघायला लागलेत? मग या ट्रिकचा वापर करा; जुना स्वेटर दिसेल नव्यासारखा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.