या प्रकारांत मोदक नेहमीच्या पद्धतीने तयार केले जातात व त्यानंतर उणे ८० अंश तापमानात ‘ब्लास्ट फ्रीझिंग’ केले जाते. पुढे उणे १८ अंश तापमानात ते साठवले जाऊ शकतात. ते गरम केल्यास त्यावरील बर्फ वितळून जाऊन ते खाण्यायोग्य होतात. पुण्याबाहेरील शहरांमध्ये आणि विशेषतः परदेशात या फ्रोझन मोदकांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
साखर, काजू, बदाम अशा मिष्टान्नांसाठी लागणाऱ्या सगळ्याच कच्च्या मालाचे भाव वाढल्याने साहजिकच मोदक व लाडूंचे दर वाढले आहेत. सगळ्याच पदार्थांच्या किमतीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. तरीही मागणीवर परिणाम झाला नाही.