हृदयाशी संबंधित आजाराबाबत जागरूकता महत्त्वाची
मुंबई: वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रलने प्रेस क्लब मुंबईच्या सहकार्याने जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यम प्रतिनिधींच्या (मीडिया प्रोफेशनल्स) आवश्यक आरोग्य तपासण्यांसह हृदयाच्या आरोग्याविषयी जागरुकतेचे महत्त्व सांगून पटवून देण्यात आले.
जागतिक हृदय दिनाचे महत्त्व आणि हृदयाच्या आरोग्याचे जागतिक स्मरण (रिमांईंडर) म्हणून कसे कार्य करते याच्या परिचयाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. यानंतर भारतातील हृदयविकाराच्या वाढत्या आकडेवारीवर आणि जीवनशैलीतील बदल हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी कसे योगदान देऊ शकतात, यावर चर्चा करण्यात आली.
हृदय दिन का साजरा करावा
वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकीय संचालिका जहाबिया खोराकीवाला यांनी या उपक्रमाबद्दल आपले विचार शेअर केले, जागतिक हृदय दिन साजरा करणे अत्यावश्यक आहे. या निमित्ताने हृदयाच्या आरोग्याकडे प्रत्येक स्तरावर लक्ष देणे आवश्यक आहे. प्रेस क्लब मुंबई सोबतच याबाबत जागरुकता निर्माण करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रसारमाध्यम प्रतिनिधी, जे लोकांना शिक्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, आम्हाला विश्वास आहे की योग्य ज्ञान असलेल्या व्यक्तींना सशक्त करून, आम्ही भारतातील हृदयविकारांशी लढण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रभाव पाडू शकतो.
हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकता महत्त्वाची
डॉ. वीरेंद्र चौहान, केंद्र प्रमुख, वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल यांनीही या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हृदयाच्या आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी आपण सक्रिय पावले उचलणे अत्यावश्यक असून ज्यांच्याकडे व्यासपीठ आहे त्यांच्यापासून सुरुवात करण्यापेक्षा आणखी चांगला मार्ग कोणता आहे, हेही तपासून पाहण्याची गरज आहे. या माध्यमातून हृदयाच्या आरोग्याबाबत लाखो लोकांपर्यंत जागरूकतेचा मेसेज पोहोचण्याचा आमचा उपक्रम असून तो सीपीआरवर व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर देतो. हे एक आवश्यक कौशल्य असून आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्याचा जीव वाचवला जाउ शकतो.
विविध चाचण्यांचे आयोजन
मीडियाने मोठ्या प्रमाणात दर्शविली उपस्थिती
या कार्यक्रमात जागतिक हृदय दिनाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. सदर प्रसंगी प्रसारमाध्यमांचे अनेक प्रतिनिधी सहभागी झाले होते. उपक्रमाचा एक भाग म्हणून वोक्हार्ट हॉस्पिटल्सने माध्यम प्रतिनिधींसाठी विविध आरोग्य चाचण्यांचे आयोजन केले होते. त्यात लिपिड प्रोफाइल, ईसीजी, टू डी इको, संपूर्ण रक्त गणना (कम्पिल ब्लड काउंट), तणाव व्यवस्थापन मूल्यमापन (स्ट्रेस मॅनेजमेंट असेसमेंट्स) तसेच वैयक्तिक हृदयाच्या आरोग्याची सर्वसमावेशक समज प्रदान करण्याबाबत डॉक्टरांशी कन्सल्ट करण्यात आले.
CPR बाबत माहिती
अनुभवी परिचारिकांच्या नेतृत्वाखाली एक सर्वसमावेशक सीपीआर प्रशिक्षण सत्र झाले. यावेळी स्वयंसेवक म्हणून सराव आणि तंत्र समजून घेण्यासाठी माध्यमातील प्रतिनिधींना मंचावर आमंत्रित करण्यात आले. ह्रदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत कृती करण्याच्या महत्त्वावर या हँड-ऑन प्रशिक्षणाने भर दिला. ज्यामुळे जीवन आणि मृत्यू यातील फरक समजून सांगण्यात आला.
जीवनशैलीतील बदलांचे हृदयाच्या आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर डॉ. ऋतुजा उगलमुगले यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी निरोगी हृदय राखण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, तणाव व्यवस्थापन आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व सांगितले.
हेदेखील वाचा – World Heart Day 2024: का साजरा होतो जागतिक हृदय दिन, महत्त्व आणि जागरूकता जाणून घ्या
जागरूकता महत्त्वाची
जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित आरोग्यविषयक कार्यक्रमामध्ये सुमारे 50 माध्यम प्रतिनिधी आणि प्रमुख भागधारकांनी सहभाग दर्शवला. जागरूकता निर्माण करण्यासह प्रसारमाध्यम प्रतिनिधींना त्यांच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करण्यादृष्टीने हे एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरले. हृदयाच्या रोगांबाबत अनेकांचा जीव वाचवण्याच्या मोठ्या मिशनमध्ये असे कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरतात.