Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमधील रहस्यमय गाव! जिथे सगळेच लोक ठेंगणे; लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी

आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे रहस्य आजही गूढ आहे. आज आम्ही तूम्हाला अशाच एका सहस्यमयी गावाविषयी सांगणार आहोत जिथे बहुतेक लोक ठेंगणे आहेत. या देशातील नागरिकांची उंटी 3 फूटांपेक्षा कमी आहे. या रहस्यमयी गावात बौनेपणाचे कारण आजपर्यंत शास्त्रज्ञांसाठीही एक मोठे रहस्य आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 16, 2024 | 04:56 PM
चीनमधील रहस्यमय गाव! जिथे सगळेच लोक ठेंगणे; लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी

चीनमधील रहस्यमय गाव! जिथे सगळेच लोक ठेंगणे; लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे रहस्य आजही गूढ आहे. आज आम्ही तूम्हाला अशाच एका सहस्यमयी गावाविषयी सांगणार आहोत जिथे बहुतेक लोक ठेंगणे आहेत. या देशातील नागरिकांची उंटी 3 फूटांपेक्षा कमी आहे. या रहस्यमयी गावात बौनेपणाचे कारण आजपर्यंत शास्त्रज्ञांसाठीही एक मोठे रहस्य आहे, आज आम्ही तुम्हाला त्याच्याशी संबंधित काही मनोरंजक गोष्टी सांगमार आहोत ज्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

चीनमधील सिचुआन प्रांतातील यांगसी नावाचे गाव एक अद्वितीय आणि रहस्यमय ठिकाण आहे. या गावाची वैशिष्ट्य म्हणजे येथील बहुतेक लोकांची उंची 3 फुटांपेक्षा कमी आहे. यामुळे या गावाला जगभरात “बटू लोकांचे गाव” म्हणून ओळखले जाते. यांगसी गावात सुमारे 80 लोकसंख्या आहे. या लोकसंख्येमधील 36 जणांची उंची केवळ 2 फूट 1 इंच ते 3 फूट 10 इंच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आजपर्यंत यामागचे कारण शोधण्यात त्यांना यश आलेले नाही.

हे देखील वाचा- Destination Wedding करायचेय? मग भारतातील ‘ही’ ठिकाणे तुमच्यासाठी सर्वोत्तम असतील; कमी बजेटमध्ये करा प्लॅनिंग

ठेंगणे लोक 1911 पासून दिसण्यास सुरूवात झाली

मिळालेल्या माहितीनुसार, यांगसी गावामध्ये बटू लोक दिसण्यास 1911 पासून सुरूवात झाली. नंतर 1951 मध्ये प्रशासनाला याची माहिती मिळाल्यानंतर यावर अधिकृत संशोधन सुरू करण्यात आले. 1985 च्या जनगणनेनुसार या गावात 119 लोकांमध्ये लहान उंचीची समस्या नोंदवली गेली. यानंतर शास्त्रज्ञांनी या स्थितीच्या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी अनेक प्रयोग केले. गावातील पाणी, माती, अन्नपदार्थ आदींच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, परंतु त्यातून शास्त्रज्ञांना कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही.

काही शास्त्रज्ञांच्या मते, गावातील जमिनीत पाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने त्यांतील विषारी घटकांमुळे येथील लोकांच्या उंचीच्या वाढीवर परिणाम झाला असल्याची शक्यता आहे. तसेच, दुसऱ्या महायुद्धात जपानी सैन्याने या भागात विषारी वायू सोडला असावा, ज्याचा परिणामार्थ येथील लोकांची उंटी खुंटली असावी. अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याचे कोणतेही ठोस पुरावेे सापडलेले नाहीत. त्यामुळे या गावाच्या रहस्यमय परिस्थितीवर अनेक शास्त्रज्ञ एकमत नाही.

पर्यटकांना गावात येण्यास परवानगी नाही

अतिशय दुर्गम आणि अलिप्त असलेल्या या गावात बाहेरील लोकांना प्रवेश मिळण्यास बंदी आहे. स्थानिक लोक या समस्येचे कारण दुष्ट शक्तींना मानतात, ज्यामुळे बाहेरील जगाशी फारसे संपर्क केला जात नाही. गावातील रहस्यमय परिस्थितीमुळे पर्यटकांनाही येथे येण्याची परवानगी नाही. या सगळ्या अनुत्तरित प्रश्नांमुळे यांगसी गाव हे जगभरातील शास्त्रज्ञ, संशोधक आणि उत्सुकता असलेल्या लोकांसाठी एक रहस्यमय ठिकाण बनले आहे. आजही या गावातील लोकांची उंची वाढणे का थांबले आहे, हे एक गूढ उरलेले आहे.

हे देखील वाचा-  पेंच नॅशनल पार्क: लांब चोचीच्या गिधाडांचे घर; वन्यजीव प्रेमींसाठी अनोखा अनुभव

Web Title: Mysterious village in china where all the people height less than 3 feet tall nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 04:56 PM

Topics:  

  • China

संबंधित बातम्या

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला
1

Rajasthan: भारताचे चीनवरील अवलंबित्व संपणार; राजस्थानमध्ये १४ दशलक्ष टन लिथियमचा साठा सापडला

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला
2

VIRAL VIDEO : अभियांत्रिकी चमत्कार! आयफेल टॉवरच्या दुप्पट उंचीचा जगातील सर्वात उंच पूल चीनने जनतेसाठी केला खुला

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने
3

China Aid : पूरग्रस्त पाकिस्तानला चीनकडून मदतीचा हात; रावळपिंडीत उतरली दोन विशेष विमाने

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी
4

Germany lithium: भारताच्या ‘या’ मित्रराष्ट्राला सापडला 43 दशलक्ष टन लिथियम; ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात वाढणार भागीदारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.