PCOS आणि लठ्ठपणा यांचा काय संबंध
साध्या सरळ भाषेत पीसीओएस म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. संप्रेरकातील असंतुलन. पीसीओएस या समस्येमुळे स्त्रीबीज तयार होत नाहीत. पाळी नियमित येत नाही. चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या फोड येतात. चेहऱ्यावरील केस वाढतात. लठ्ठपणा, कौटुंबिक इतिहास, आनुवंशिकता, इन्सुलिन प्रतिरोधक घटकांमुळे ही समस्या उद्भवते.
चेहऱ्यावर आणि शरीरावर अवांछित केस, पुरळ, अनियमित मासिक पाळी, वजन वाढणे, त्वचेवर काळे डाग पडणे, वंध्यत्व, केस गळणे अशी लक्षणे आढळून येतात. डॉ. अपर्णा गोविल भास्कर,सल्लागार बॅरिएट्रिक आणि लॅपरोस्कोपिक सर्जन, मेटाहेल – लॅपरोस्कोपी आणि बॅरिएट्रिक सर्जरी सेंटर, मुंबई; सैफी, अपोलो आणि नमाहा हॉस्पिटल्स, मुंबई यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
कशी आहे प्रक्रिया
लठ्ठपणा कसा वाढतोय
पीसीओएसमुळे अंडाशयामध्ये सूक्ष्म द्रवाने युक्त पिशव्या (ज्याला गाठी किंवा कूपा/ग्रंथी म्हणतात) निर्माण होऊ शकतात मात्र ते बर्याचदा पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही आणि त्यांतून अंडी स्रवली जात नाहीत. ज्यातून पुढे अविकसित कुपांची खूप जास्त उत्पत्ती होऊ शकते आणि ओव्ह्युलेशनच्या नेहमीच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
सीओएसमधील हार्मोनल असंतुलन आणि इन्सुलिनचा प्रतिकार यामुळे वजन कमी करणे अधिक कठीण होते, तर जास्त वजन पीसीओएसची लक्षणे वाढवते. लठ्ठपणामुळो पीसीओएसशी संबंधित इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढवतो, जसे की टाइप 2 मधुमेह, उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब. तथापि, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की लठ्ठपणा हे पीसीओएसचे एकमेव कारण नाही. पीसीओएस आणि लठ्ठपणा याबाबत असलेले गैरसमज दूर करणे आणि जागरूकता व व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज (PCOD) आणि लठ्ठपणा याबाबत असलेले समज व गैरसमज खालील प्रमाणे येथे दिले आहेत.
केवळ लठ्ठपणा हेच पीसीओएसचे कारण आहे का
वास्तविकता: पीसीओडीसाठी लठ्ठपणा हा एक जोखीम घटक असला तरी, हे एकमेव कारण ठरत नाही. PCOD ही सामान्य वजनाच्या स्त्रियांना देखील प्रभावित करू शकते. पीसीओडीच्या विकासामध्ये अनुवांशिकता, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि हार्मोनल असंतुलन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
हेदेखील वाचा – PCOS आणि प्रजनन क्षमतेचा संबंध, गर्भधारणा होते की नाही काय सांगतात तज्ज्ञ
लवकर वजनवाढ होते का
वास्तविकता: PCOD असलेल्या महिला लठ्ठ असतीलच असे नाही. सामान्य किंवा कमी बीएमआय असलेल्या अनेक स्त्रियांना ही समस्या असू शकते. लठ्ठपणामुळे लक्षणे आणखी बिघडू शकतात, परंतु सामान्य वजनाच्या स्त्रियांमध्येही पीसीओडीची लक्षणे दिसून येतात.
वजन कमी झाल्यावरच पीसीओडी कमी होतो
वास्तविकता: वजन कमी केल्याने लक्षणे कमी होण्यास मदत होते, परंतु ते पीसीओडी हा आजार बरा करू शकत नाही. जीवनशैलीतील बदल हे लक्षणे नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
हेदेखील वाचा – ‘पीसीओएस’मुळे मानसिक आरोग्यावर ताण येतोय ? मग ‘ही’ बातमी वाचाच
पीसीओडीदरम्यान वजन कसे वाढते
वास्तविकता: PCOD असलेल्या महिलांना अनेकदा इन्सुलिनच्या प्रतिकाराचा सामना करावा लागतो, ज्यामुळे वजन कमी करणे आव्हानात्मक होते आणि निरोगी आहारानेही वजन वाढू शकते. हार्मोनल असंतुलन देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, जे जास्त न खाता देखील वजन वाढवते.
सहज वजन कमी होऊ शकतं का
वास्तविकता: इंसुलिन प्रतिरोध आणि हार्मोनल समस्यांमुळे, पीसीओडी असलेल्या स्त्रियांसाठी वजन कमी करणे इतरांपेक्षा जास्त आव्हानात्मक असू शकते. त्यांचे वजन प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यासाठी त्यांना विशिष्ट आहार योजना आणि व्यायामासारख्या उपचारांची आवश्यकता भासू शकते. लठ्ठपणाशी संबंधित प्रकरणांमध्ये रोगाच्या टप्प्यावर अवलंबून औषधे, एंडोस्कोपिक पर्याय किंवा बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया यासारखे वजन कमी करण्याच्या पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.
वस्तुस्थिती: लठ्ठपणा आणि PCOD मुळे टाईप 2 मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या चयापचय स्थितींचा धोका देखील वाढू शकतो. प्रजनन आरोग्याच्या चिंतेव्यतिरिक्त या समस्यांबद्दल जागरूक असणे आणि त्यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.