PCOS असल्यास गर्भधारणा होते की नाही
पीसीओएस (पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन सिंड्रोम) असलेल्या महिलांमधील अंत:स्रावी ग्रंथींतील समस्येमुळे त्यांचे ओव्ह्युलेशन होऊ शकत नाही. बहुतांशी महिलांच्या मासिक पाळीमध्ये अनियमितता, अस्पष्ट कारणास्तव वजनातील वाढ आणि केसांची असाधारण वाढ (हर्सुटिझ्म) किंवा पुरूषांसारखे केसांच्या वाढीचे स्वरूप इ. दिसून येते.
जागतिक स्तरावर पाहता हे प्रमाण 6-26% असून भारतातील या घटनांचे प्रमाण 3.7%-22.5%
असल्याचे दिसून येते, महिलांमध्ये अंत:स्रावी ग्रंथींची ही स्थिती सर्वसाधारणपणे दिसून येते आणि हे वंध्यत्व उद्भवण्यास कारणीभूत ठरू शकते. चेताअंत:स्रावी कोश प्रणाली, खाद्यपदार्थ, लठ्ठपणा, निष्क्रियता आणि आनुवांशिकत्व हे पीसीओएस परिस्थिती विकसित होण्याचे धोकादायक घटक आहेत. न्युबर्ग अजय शाह लॅबोरेटरीचे कार्यकारी संचालक, डॉ. अजय शाह यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
काय होतो अंडाशयावर परिणाम
महिलांच्या अंडाशयावर पीसीओएसमुळे काय परिणाम होतो
पीसीओएसमुळे अंडाशयामध्ये सूक्ष्म द्रवाने युक्त पिशव्या (ज्याला गाठी किंवा कूपा/ग्रंथी म्हणतात) निर्माण होऊ शकतात मात्र ते बर्याचदा पूर्णपणे विकसित होऊ शकत नाही आणि त्यांतून अंडी स्रवली जात नाहीत. ज्यातून पुढे अविकसित कुपांची खूप जास्त उत्पत्ती होऊ शकते आणि ओव्ह्युलेशनच्या नेहमीच्या चक्रामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
हेदेखील वाचा – PCOS चे निदान कळण्यासाठी कोणती ब्लड टेस्ट करावी, तज्ज्ञांचा खुलासा
कधी सुरू होते चक्र
मासिक पाळी कधी सुरू होते
सर्वसाधारण चक्र हे मासिक पाळीच्या 14 दिवस आधी सुरू होते जेव्हा अंडाशयातून अंडी मुक्त होतात. 12 ते 24 तासांमध्ये ती एकतर फलित होतात किंवा नाहीशी होतात. मात्र पीसीओसमुळे वंध्यत्व होऊ शकते कारण अंडी वारंवार मुक्त होत नाहीत आणि अंडाशयातच राहतात. साधारणपणे सत्तर टक्के मुली गर्भधारण करू शकत नाहीत.
एंडोमेट्रियम म्हणजे काय?
एंडोमेट्रियम म्हणजेच गर्भाशयावरील रेखीय भाग ज्यावर हार्मोन्समधील हालचालींचा आणि अनियमित अंडमोचन (ओव्ह्युलेशन) प्रक्रियेचा परिणाम होऊ शकतो. अपुर्या प्रमाणात विकसित झालेले एंडोमेट्रियम हे गर्भाच्या रोपणासाठी पुरेसे चांगले वातावरण घडवू शकत नाही. पीसीओएसचा उपचार होऊ शकत असला तरीही त्यावर उपचार न झाल्याने मधुमेह आणि पचनशक्तीशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात याबाबत सावधानगिरी बाळगण्यास डॉक्टर सांगतात.
पीसीओएसची लक्षणे
पीसीओएस आहे हे कसे ओळखावे
मासिक पाळीतील अनियमितता: मासिक पाळीच्या चक्रातील अनियमितता हे पीसीओएसमुळे
सर्वसाधारणपणे उद्भवणारे दुष्परिणाम मानले जातात. गर्भाशयावरील अस्तराचा भाग दर महिन्यातील अंडमोचन (ओव्ह्युलेशन) अयशस्वी झाल्याने कमी होत नाही, म्हणजेच पीसीओएस असलेल्या महिलेला वर्षातून आठपेक्षा कमी किंवा अजिबात मासिक पाळ्या येत नाहीत.
अतिरिक्त रक्तस्राव: गर्भाशयाच्या अस्तरावरील प्रदीर्घकाळ झालेल्या संचयामुळे येणार्या काळातील मासिक पाळी जेव्हा येईल तेव्हा ती अधिक जड जाणारी असू शकेल. पीसीओएस असलेल्या महिलांपैकी 70% पेक्षा अधिक महिलांच्या चेहर्यावर आणि शरीरावर खूपच अधिक
केसांची उत्पत्ती अनुभवास येऊ शकते ज्याला हर्सुटिझ्म देखील म्हणतात. पाठ, पोट आणि छाती येथे सर्वत्र केसांचे प्रमाण असमान प्रमाणात असू शकेल.
मुरमे: पीसीओएस असलेले रूग्ण ज्यांमध्ये टेस्टोस्टेरॉन (पुरूषांमधील संप्रेरक) असते त्यांना चिकट त्वचा आणि वारंवार त्वचा फुटण्यासारखे अनुभव येऊ शकतात जे विशेष करून चेहरा, छाती आणि पाठीच्या वरच्या भागावर परिणाम करू शकते.
त्वचेमध्ये बदल: मान, जांघ आणि स्तनांच्या खालील वळीच्या भागामधील त्वचेवर काळे चट्टे पडू शकतात.
डोकेदुखी: हार्मोन्समध्ये असाधारणता होणे हे पीसीओएस असलेल्या महिलांमध्ये डोके दुखण्याचे कारण ठरू शकते.
हेदेखील वाचा – PCOS पासून आराम हवाय? तर आहारात करा बदल
कशी घ्यावी काळजी
काळजी कशा पद्धतीने घ्यावी
जीवनशैलीतील बदल: निरोगी राहता येण्यासारखे वजन राखल्यामुळे प्रजननक्षमतेमध्ये प्रकर्षाने वाढ होते. निरोगी आहार आणि सातत्त्यपूर्ण व्यायाम केल्याने वजन कमी होऊन मासिक पाळी साधारण होऊ शकते आणि अंडमोचन होण्याची शक्यता वाढू शकते. नियमित व्यायाम करणे हे तुमच्या दिनक्रमाचा भाग बनवा ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते, इंशुलिनच्या पातळ्या नियमित केल्या जातात आणि तणाव कमी होतो.
आहारातील बदल: ग्लायसेमिक कमी असलेला आहार घेतल्यामुळे इंशुलिनच्या पातळ्या नियंत्रणात राहतात ज्या पीसीओएसच्या रूग्णांमध्ये बर्याचदा जास्त असतात. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, साखरयुक्त चटपटीत खाद्यपदार्थ आणि शर्करायुक्त पेये यांचे आहारातील प्रमाण कमी करा.
तुमचा तणाव नियंत्रणात ठेवा: तणाव व्यवस्थापन हे प्रजननक्षमतेतील समस्या कमी करण्यात उपयुक्त ठरते. तुम्ही ध्यान आणि योगासारख्या तंत्रांचा अवलंब करू शकता.
नियमित निरीक्षणे आणि परीक्षणे: तुमच्या डॉक्टरांकडून नियमित तपासणी करून घ्या आणि तुमच्या संपूर्ण आरोग्य, हार्मोनच्या पातळ्या आणि पीसीओएसच्या लक्षणांबाबत बोला. खासकरून तुम्हाला टाईप 2 मधुमेह होण्याची शक्यता असल्यास तुमच्या रक्तातील शर्करेच्या (शुगर) पातळ्या नियमित तपासून पाहा.