नरेंद्र मोदींनी देशाला केले मोठे आव्हान
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमादरम्यान भारतामध्ये वाढलेल्या लठ्ठपणाविषयी बोलताना चिंता व्यक्त केली आहे. दैनंदिन आहारात होणाऱ्या चुकीच्या सवयी आणि जीवनशैलीमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्यावर अनेक गंभीर परिणाम दिसून येतात. त्यात प्रामुख्याने लठ्ठपणामध्ये वाढ झाली आहे. शरीरात लठ्ठपणा वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय आरोग्यासंबंधित अनेक आजार वाढू लागतात. मधुमेह, कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाबाची पातळी वाढल्यानंतर शरीरातील इतर अवयवांनासुद्धा हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात शरीराला पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.(फोटो सौजन्य – iStock)
पोटावर वाढलेली चरबी वितळवण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट! जाणून घ्या कधी आणि किती प्रमाणात खावे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमादरम्यान करण्यात आलेल्या संधोधनचा उल्लेख करत म्हणले, देशामध्ये आठ जणांपैकी एक व्यक्ती लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये लठ्ठपणात मोठ्या दुप्पट वाढ झाली आहे. हल्ली अनेकजण लठ्ठपणामुळे त्रासले आहेत. वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. जगभरात सुमारे 2.5 अब्ज लोक लठ्ठपणा आणि वाढलेल्या वजनाने त्रस्त आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे बोलताना म्हणले, मी देशातील दिनेश लाल यादव निरहुआ, उद्योजक आनंद महिंद्रा,मनु भाकर, आर माधवन, ओमर अब्दुल्ला,गायिका श्रेया घोषाल, नंदन नीलेकणी, सुधा मूर्ती, मोहनलाल , मीराबाई चानू यांना दैनंदिन आहारातील 10 % खाद्यतेल कमी करण्याचा सल्ला देईन. याशिवाय त्यातील 10 लोकांना मी हेच आव्हान देईन. यामुळे लठ्ठपणाशी लढण्यासाठी मदत होईल, असे नरेंद्र मोदी म्हणले.
दैनंदिन आहारात वापरले जाणारे तेल आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. या तेलात असलेले अधिक फॅट्स शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात, ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आजार वाढण्याची शक्यता असते. दैनंदिन आहारात पामतेल किंवा शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करण्याऐवजी तेलकट काजू आणि बिया इत्यादींचा वापर करावा. बदाम, हेझलनट आणि सूर्यफूल इत्यादींचा वापर करून तयार केलेले तेल वापरू शकता. या तेलात निरोगी चरबी आढळून येते, ज्यामुळे शरीरावर वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल.
रोजच्या आहारात अनेक लोक ऑलिव्ह ऑइलचा वापर करतात. याशिवाय आरोग्यासंबंधित इतर समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी ऑलिव्ह ऑइल अतिशय प्रभावी आहे. या तेलात असलेले गुणधर्म शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रभावी ठरतात. ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवलेल्या अननपदार्थांचे सेवन केल्यास वारंवार भूक लागत नाही.
मेंदूवर घातक हल्ला करणारा आजार ‘इन्सेफलायटिस’; लक्षणे जाणवताच करा उपचार
अनेक लोक जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर करतात. मात्र जास्त प्रमाणात तेलाचा वापर केल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे स्वयंपाकातील 10 टक्के तेल कमी केल्यास वाढलेला लठ्ठपणा कमी होईल आणि वाढलेली चरबीसुद्धा जाळून जाईल. रोजच्या वापरातील 10 टक्के तेलाची खरेदी कमी केल्यास आहारातील 10 टक्के तेल कमी होण्यास मदत होईल, अन्यथा कमी होणार नाही. जेवण तयार करताना तेलाचा वापर अतिप्रमाणात केल्यामुळे मधुमेह, ताणतणाव आणि हृदयरोग इत्यादी आजार वाढू शकतात.