पोटावर वाढलेली चरबी वितळवण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट
वाढलेले वजन कमी करण्यासाठी महिला पुरुष आहार तज्ज्ञांकडून डाईट घेतात. याशिवाय तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम केला जातो. तसेच असंख्य घरगुती उपाय केले जातात. मात्र वजन कमी करताना चुकीच्या पदार्थांचे कधीही सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्याऐवजी आणखीन वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वजन कमी करताना आहारात बदल करून योग्य वेळी पौष्टिक आणि कमी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. वजन कमी करताना गोड पदार्थ कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना डार्क चॉकलेट किती आणि कधी खावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप आवडते. चॉकलेट खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. चवीला कडू असलेले डार्क चॉकलेट सर्वचजण आवडीने खातात. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे, जस्त, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे तुम्ही वाढलेले वजन कमी करताना डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता. योग्य पद्धतीने डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास पोटावर वाढलेला चरबीचा घेर नक्कीच कमी होईल.
डार्क चॉकलेट चवीला कडू असते. त्यामुळे अनेक लोक डार्क चॉकलेट खाण्याचे टाळतात. मात्र असे न करता दैनंदिन आहारात कमी प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन करावे. इतर चॉकलेटच्या तुलनेमध्ये डार्क चॉकलेटमध्ये कमी प्रमाणात साखर असते. याशिवाय यामध्ये कमी प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करताना तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकता.
डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळून येतात. याशिवाय यामध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि पॉलीफेनॉल्ससारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे खाल्यामुळे शरीराचे चयापचय सुधारते. डार्क चॉकलेटचे सेवन केल्यामुळे शरीराला आलेली सूज कमी होते आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो. चयापचय वाढल्यामुळे पोटावर वाढलेली चरबी कमी होण्यास मदत होते.
चिकन, मटण खाण्याऐवजी दैनंदिन आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त डाळीचे सेवन, शरीरातील हाडं राहतील टणक
वाढलेले वजन कमी करताना भूकेवर नियंत्रण असणे फार गरजेचे आहे, अन्यथा वजन कमी होण्याऐवजी आणखीनच वाढण्याची शक्यता असते. शरीरातील इन्सुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कमी साखर युक्त पदार्थांचे सेवन करावे. वजन कमी करताना वारंवार स्नॅक्स न खाता पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.