Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 28 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2025 : नवरात्रीचा उपवास केलाय का? मग आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स; फारच सोपी आहे रेसिपी

Potato Chips Recipe : नवरात्रीसारख्या उपवासाच्या काळात, घरगुती बटाट्याचे चिप्स हा एक सोपा, झटपट आणि स्वादिष्ट पर्याय ठरतो. बाहेरून खरेदी केले जाणारे, सर्वांच्या आवडीचे हे चिप्स सोप्या पद्धतीने घरीच बनवता येतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 25, 2025 | 03:30 PM
Navratri 2025 : नवरात्रीचा उपवास केलाय का? मग आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स; फारच सोपी आहे रेसिपी

Navratri 2025 : नवरात्रीचा उपवास केलाय का? मग आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स; फारच सोपी आहे रेसिपी

Follow Us
Follow Us:

भारतीय संस्कृतीत नवरात्रोत्सव हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र सण मानला जातो. या नऊ दिवसांत भक्तगण देवीची आराधना करतात आणि अनेक जण उपवास पाळतात. उपवासात धान्य, कडधान्य व मसाले खाण्यावर बंधन असते, त्यामुळे उपवासात खाल्ले जाणारे पदार्थ थोडे वेगळे असतात. साबुदाणा खिचडी, राजगिरा पुरी, शेंगदाणा लाडू, फलाहार यासोबतच घरगुती बटाट्याचे चिप्स ही एक लोकप्रिय आणि हलकी-फुलकी डिश आहे. शिवाय मिड नाइट स्नॅक्ससाठीही हा एक उत्तम आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे.

काही तर वेगळं होऊन जाऊद्यात, यंदाच्या विकेंडला घरी बनवा झणझणीत ‘चिकन भूना’

बाजारात सहज मिळणारे पॅक केलेले चिप्स चवदार असले तरी ते आरोग्यासाठी नेहमी चांगले नसतात. त्यात जास्त प्रमाणात मीठ, मसाले, कृत्रिम फ्लेवर्स आणि तेल वापरलेले असते. पण घरी केलेले चिप्स मात्र स्वच्छ, पौष्टिक आणि उपवासासाठी अगदी योग्य असतात. त्यात तुम्ही आपल्या आवडीनुसार मीठ आणि तेलाचे प्रमाण नियंत्रित करू शकता. घरगुती चिप्सची खासियत म्हणजे ते कडक आणि कुरकुरीत होतात, तसेच त्यांचा नैसर्गिक बटाट्याचा स्वाद टिकून राहतो. हे चिप्स उपवासात चहा, दही किंवा फक्त तस्से खायलासुद्धा खूप छान लागतात. एकदा करून ठेवले तर ८-१० दिवस सहज टिकतात.

साहित्य :

  • बटाटे – ८ ते १० (साल काढलेले)
  • पाणी – आवश्यकतेनुसार
  • सैंधव मीठ (सैंधव मीठ) – चवीनुसार
  • तूप/तेल – तळण्यासाठी
Fasting Recipe: उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी, दह्यासोबत लागेल चविष्ट

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुऊन त्याची साल काढून घ्या.
  • आता त्याचे बारीक काप चिप्स कटर किंवा धारदार सुरीने कापा.
  • कापलेल्या बटाट्याचे काप पाण्यात टाका, म्हणजे त्यांचा रंग बदलणार नाही.
  • सर्व काप चांगले धुऊन स्वच्छ कापडावर किंवा टॉवेलवर पसरवून वाळवून घ्या.
  • पूर्णपणे कोरडे झाल्यावर कढईत तेल किंवा तूप गरम करून थोडे थोडे करून बटाट्याचे काप तळून घ्या.
  • चिप्स सोनेरी आणि कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढून टिश्यू पेपरवर ठेवा.
  • अजून गरम असतानाच त्यावर सैंधव मीठ शिंपडा आणि थंड झाल्यावर हवाबंद डब्यात साठवा.
  • हे घरगुती चिप्स उपवासात दही, शेंगदाणा लाडू, साबुदाणा खिचडीबरोबर खायला मस्त लागतात.
  • संध्याकाळच्या वेळेस उपवासात चहा घेताना हा हलका आणि चविष्ट स्नॅक एक उत्तम पर्याय ठरतो.

Web Title: Navratri 2025 know how to make crispy and easy potato chips at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • marathi recipe
  • potato recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा
1

Vatpournima 2026 : उपवासाला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग चवीचे ‘साबुदाणा वडे’, रेसिपी नोट करा

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर
3

Beetroot Chila Recipe : लालचुटूक बीटापासून घरी बनवा हेल्दी आणि टेस्टी चिला, पोषकतत्वांनी आहे भरपूर

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
4

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.