Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moong Dal Paratha: हेल्दी खायचंय, पण चवही हवी? मग बनवा झटपट मूगडाळीचे पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

Moong Dal Paratha Recipe: जर तुम्हालाही बटाटा किंवा मेथीचा पराठा खाऊन कंटाळ आला असेल. तर ही हेल्दी आणि टेस्टी मूग डाळीच्या पराठ्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 11, 2026 | 05:40 PM
Photo- Ai generated

Photo- Ai generated

Follow Us
Follow Us:
  • नाश्त्यात प्रोटीनचा डोस हवा?
  • काही मिनिटांत बनवा मूगडाळीचे पराठे
  • रेसिपी नक्की ट्राय करा
Moong Dal Paratha: हिवाळ्यातील थंड वातावरणात अनेकांना काहीतरी गरमागरम, चमचमीत आणि टेस्टी खाण्याची इच्छा होते. तुम्ही अनेकदा बटाटा, मेथी, पनीर किंवा मुळा यांचा पराठा खाल्ला असाल. परंतु, जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही तरी हेल्दी किंवा टेस्टी खायचं असेल तर मूगडाळीचे पराठे एकदा नक्की ट्राय करा. मूगाच्या डाळीत प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे मूगडाळीचे पराठे नाश्त्यासाठी चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतात. विशेष म्हणजे, तुम्ही घरातील उपलब्ध साहित्य वापरून ही सोपी झटपट तयाकर करु शकता. चला तर जाणून घेऊया मूगडाळीचे पराठे बनवण्याची सोपी रेसिपी.

High Blood Pressure: थंडीच्या दिवसांत ब्लड प्रेशर का वाढतो? रोजच्या ‘या’ चुका ठरू शकतात धोकादायक; वेळीच घ्या काळजी

मूगडाळीचे पराठे बनवण्यासाठी साहित्य

  • १ कप मूगडाळ (२ ते ३ तास भिजवलेली)
  • २ कप गव्हाचे पीठ
  • १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा
  • १ चमचा आले-लसूण पेस्ट
  • १ ते २ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • अर्धा चमचा हळद
  • अर्धा चमचा लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • तेल किंवा आवश्यकतेनुसार तूप

मूगडाळीचे पराठे बनवण्याची सोपी पद्धत

सर्वप्रथम भिजवलेल्या मूगडाळीतील पाणी काढून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये डाळ घालून जाडसर वाटून घ्या. यानंतर, एका कढईत तेल चांगले गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर यामध्ये जिरे आणि हिंग घाला. त्यानंतर आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मंद आचेवर मसाला शिजवा. त्यात वाटलेली मूगडाळ घालून मिश्रणातील ओलावा कमी होईपर्यंत व्यवस्थित शिजवा. शेवटी कोथिंबीर घालून हे मिश्रण थंड होऊ द्या. आत, गव्हाच्या पिठात पाणी घालून मऊसर नीट पीठ मळून घ्या. त्याचे गोळे करून त्यात मूगडाळीचे मिश्रण भरा. नंतर हलक्या हाताने पराठे लाटून घ्या. तवा चांगला गरम झाल्यावर पराठे दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून खरपूस भाजून घ्या. तुम्ही हे मूगडाळीचे गरमागरम पराठे दही, हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करु शकता.

मूगडाळीचे पराठे बनवताना या ५ टिप्स लक्षात ठेवा

  • मूगडाळ किमान २ ते ३ तास भिजवा.
  • डाळ वाटताना जास्त पाणी घालून मिश्रण पातळ करु नका.
  • पराठे नेहमी हलक्या हाताने लाटा. अन्यथा ते फाटू शकतात.
Tea Side Effects: चहा प्यायल्यानंतर लगेच जेवण करता? थांबा! आरोग्य जपण्यासाठी काय आहे योग्य नियम?

Web Title: Moong dal paratha easy recipe high protein healthy breakfast pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food news
  • healthy recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
1

Food Recipe: घरी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी झटपट बनवा चविष्ट पनीर कटलेट, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ
2

Diwali Special Recipe: दिवाळीच्या फराळात हवी खास मिठाई! हलवाई स्टाईलने झटपट बनवा बॉम्बे आईस माहिम हलवा, नोट करा पदार्थ

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर
3

Diwali 2026: गोड पदार्थ खाण्याची इच्छा होईल पूर्ण! साखरेचा अजिबात वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा शुगर फ्री मखाणा खीर

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा
4

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.