(फोटो सौजन्य: Pinterest)
भारतीय खाद्यसंस्कृतीत चिकनचे अनेक प्रकार आवडीने बनवले जातात. बिर्याणी, करी, कोरमा, हंडी, तंदुरी असे अनेक पदार्थ आपण नेहमी खातो. पण त्यात एक वेगळीच चवदार डिश म्हणजे चिकन भुना. “भुना” हा शब्द हिंदी/उर्दू पाककृतीतून आलेला असून त्याचा अर्थ म्हणजे मसाले आणि मांस मंद आचेवर हळूहळू परतणे. या प्रक्रियेत कांदा, आलं-लसूण, टोमॅटो आणि खमंग मसाले तेलात परतले जातात व त्यात चिकन शिजवलं जातं. या डिशची खासियत म्हणजे यात भरपूर पाणी टाकले जात नाही. चिकन स्वतःच्या रसात आणि परतलेल्या मसाल्यात शिजते. त्यामुळे मसाल्याची प्रत्येक चव चिकनच्या प्रत्येक तुकड्यात मुरते. मसालेदार, घट्ट आणि सुगंधी अशी ही डिश जेवणात अप्रतिम लागते.
Fasting Recipe: उपवासाच्या दिवशी झटपट घरी बनवा कुरकुरीत साबुदाण्याची भजी, दह्यासोबत लागेल चविष्ट
चिकन भुना हा पदार्थ रेस्टॉरंटमध्ये लोकप्रिय आहे, पण तो घरीसुद्धा सहज बनवता येतो. यासाठी लागणारे साहित्य साधे असून आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असते. विशेष म्हणजे हा पदार्थ कोणत्याही खास प्रसंगी, पाहुण्यांसाठी किंवा आठवड्याच्या शेवटी खास जेवणासाठी उत्तम पर्याय आहे. गरमागरम पोळी, भाकरी, नान किंवा वाफेच्या भाताबरोबर खाल्ल्यास याची चव अजूनच खुलून येते. म्हणूनच चिकन भुना ही रेसिपी प्रत्येकाने एकदा नक्की करून पाहावी.
साहित्य :
कृती :