Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाची भजी

Upvas Crispy Bhaji Recipe : नवरात्रीत अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. अनेकदा उपवासाची तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही घरीच कुरकुरीत अन् चविष्ट असे उपवासाचे भजी घरी बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 26, 2025 | 09:36 AM
Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाचे भजी

Navratri 2025 : व्रतावेळी काही टेस्टी खायची इच्छा होतेय? मग घरी बनवा कुरकुरीत उपवासाचे भजी

Follow Us
Follow Us:

उपवास म्हणजे फक्त धार्मिक विधी नसून शरीराला शुद्ध करण्याची एक सुंदर पद्धत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत उपवासाला खूप महत्त्व आहे. नवरात्री, एकादशी, महाशिवरात्री किंवा इतर धार्मिक प्रसंगी उपवास केला जातो. अशा वेळी खाण्याच्या पदार्थांमध्ये थोडे वेगळेपण असते. तांदूळ, गहू किंवा इतर धान्यांचे पदार्थ टाळले जातात आणि त्याऐवजी साबुदाणा, राजगिरा, शेंगदाणे, बटाटा इत्यादींचा वापर करून उपवासाचे खास पदार्थ तयार केले जातात.

वांग खायला आवडत नाही? मग ‘या’ पद्धतीने बनवा चविष्ट मसालेदार वांग्याची भाजी, चवीला लागेल मस्त

उपवासाचे पदार्थ म्हटले की लगेचच डोळ्यासमोर येतात ते म्हणजे साबुदाणा खिचडी, उपवासाचे थालिपीठ, फराळाची बटाट्याची भाजी किंवा मग कुरकुरीत भजी. भजी हा पदार्थ कोणत्याही उपवासाचा खास आकर्षण असतो. पावसाळ्यातल्या पावसाबरोबर खाल्ली जाणारी भजी जशी चविष्ट लागतात, तशीच उपवासातील भजीदेखील हलक्या-फुलक्या आणि कुरकुरीत लागतात. आज आपण बघणार आहोत उपवासाची कुरकुरीत भजी रेसिपी जी झटपट होते आणि उपवासात खाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे.

साहित्य

  • २ उकडलेले बटाटे (किसून घ्यावे)
  • ½ कप साबुदाणा पीठ किंवा राजगिरा पीठ
  • ¼ कप शेंगदाणे कूट
  • २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
  • ½ टीस्पून जिरे
  • मीठ (उपवासाचे) चवीनुसार
  • थोडी कोथिंबीर (ऐच्छिक)
  • तेल तळण्यासाठी
Navratri 2025 : नवरात्रीचा उपवास केलाय का? मग आता घरीच बनवा कुरकुरीत बटाट्याचे चिप्स; फारच सोपी आहे रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम उकडलेले बटाटे किसून घ्यावेत आणि एका परातीत काढावेत.
  • त्यात साबुदाणा पीठ किंवा राजगिरा पीठ घालावे.
  • नंतर त्यात शेंगदाणे कूट, हिरव्या मिरच्या, जिरे आणि मीठ टाकावे.
  • थोडेसे पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करावे. मिश्रण खूप पातळ करू नये.
  • आता कढईत तेल गरम करून घ्यावे.
  • हाताने किंवा चमच्याने छोटे गोळे करून गरम तेलात सोडावेत.
  • सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यावीत आणि टिश्यू पेपरवर काढून गरमागरम सर्व्ह करावीत.
  • ही कुरकुरीत भजी तुम्ही दही किंवा हिरवी चटणीसोबत खाऊ शकता.
  • उपवासात झटपट होणारा आणि चविष्ट लागणारा हा पदार्थ तुम्ही नक्की करून बघा.

Web Title: Navratri 2025 want to eat something tasty during the fast then make crispy fasting bhajis at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2025 | 09:32 AM

Topics:  

  • marathi recipe
  • Navratri 2025
  • upvas food

संबंधित बातम्या

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’
1

Monsoon Special Recipe : संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरील आणि मसालेदार ‘ब्रेड पकोडा’

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
3

Recipe : बटाट्यापासून नाही यंदा कच्च्या केळ्यापासून बनवा खमंग आणि कुरकुरीत ‘टूक’, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’
4

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.