Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

Navratri 2026 : शारदीय नवरात्र २०२६ यंदा ११ ते १९ ऑक्टोबरदरम्यान साजरे केले जाणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसासाठी एक खास रंग विशेष मानला जातो. या रंगांमागे धार्मिक महत्त्व असून, भाविकही त्या दिवशी संबंधित रंगाचे कपडे परिधान करून उत्सव साजरा करतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 06, 2026 | 08:15 PM
Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

Navratri Colors: गरबा नाइट्ससाठी राहा रेडी! नवरात्री २०२६ चे ९ रंग ठरले; जाणून घ्या महत्त्व आणि संपूर्ण दिनविशेष!

Follow Us
Follow Us:
  • नवरात्रीच्या प्रत्येक दिवसासाठी वेगळा शुभ रंग निश्चित असून, त्याचे खास धार्मिक महत्त्व आहे.
  • देवीच्या नऊ रूपांच्या पूजेसोबत या रंगांना सकारात्मकता, शक्ती आणि समृद्धीशी जोडले जाते.
  • यंदाच्या नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग परिधान करायचा, हे जाणून घेण्यासाठी ही यादी नक्की पाहा.
यंदा शारदीय नवरात्र २०२६ यंदा ११ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत साजरा केली जाणार आहे. या सणानिमित्त देवीच्या ९ रुपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा सण हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. देवीच्या विविध शक्तीस्वरूपांची पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा सण खास ठरतो. नऊ दिवसांच्या उत्सवातील प्रत्येक दिवस हा खास ठरत असतो. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते आणि प्रत्येक दिवसासाठी एक खास, शुभ रंग निश्चत केला जातो. नऊ दिवस ठरवलेल्या या रंगातच देवीला सजवले जाते आणि तिची पूजा केली जाते. भाविक देखील नऊ दिवस या खास रंगाचे कपडे परिधान करुन नवरात्रीचा उत्सव मोठ्या आवडीने साजरा करतात. यावर्षी नवरात्रीसाठी कोणते ९ रंग शुभ ठरणार आहेत ते आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

नवरात्रीत दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. प्रत्येक दिवस हा एका विशिष्ट रंगाशी जोडलेला असतो, जो त्या दिवसासाठी शुभ मानला जातो. भक्त अनेकदा या रंगाचे कपडे परिधान करुन एक प्रकारे सण साजरा करतात. हे रंग शुभता आणि सकारात्मकत ऊर्जेचे प्रतीक मानले जातात. चला तर मग नवरात्रीचे नऊ रंग (Nine Colors Of Navratri) आणि त्यांचे महत्त्व जाणून घेऊया.

Navratri 2026 : या ठिकाणी आहेत देवीच्या 9 रूपांची मंदिरे, नवरात्रीत भरते भक्तांची गर्दी

पहिला दिवस – केशरी रंग

नवरात्रीचा पहिला दिवस हा शैलपुत्री देवीला समर्पित असतो. या दिवसासाठी केशरी हा रंग खास ठरणार आहे. हा रंग सर्जनशीलता, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. या दिवशी भक्त केशरी रंगाचे कपडे घालून देवीकडे मनाची शांती आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करतील.

दुसरा दिवस – पांढरा रंग

सणाचा दुसरा दिवस हा ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे. या दिवशी पांढऱ्या रंगला विशेष महत्त्व आहे. पांढरा रंग हा शांती, पवित्रता आणि साधेपणाचा प्रतीक मानला जातो. या दिवशी भक्त पांढऱ्या रंगाचे कपडे घालून देवीकडे मनाची शांती आणि सकारात्मकतेसाठी प्रार्थना करतील.

तिसरा दिवस – लाल रंग

नवरात्रीचा तिसरा दिवस हा देवी चंद्रघंटा हिला समर्पित असून या दिवशी लाल रंग हा रंग खास ठरणार आहे. हा रंग अनेकांच्या आवडीचा आहे. लाल रंग हा प्रेम, उर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानला जातो. भक्त या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करुन देवीकडे धैर्य आणि शक्तीचा आशीर्वाद मागू शकतात.

चाैथा दिवस – राॅयल ब्लू

नऊ रात्रींचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवरात्री या सणातील चाैथा दिवस देवी कूष्मांडाला समर्पित करण्यात येणार आहे. या दिवशी राॅयल ब्लू हा रंग खास ठरणार आहे. हा रंग शक्ती आणि शांतीचे प्रतीक ठरतो. तिसऱ्या दिवशी या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीची आराधना करु शकता. लक्षात घ्या, प्रत्येक दिवसासाठी ठरवण्यात आलेला हा रंग त्या दिवसासाठी शुभ मानला जाणार आहे. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे साहस आणि जीवनात संतुलन मिळावे यासाठी प्रार्थना करु शकता.

पाचवा दिवस – पिवळा रंग

नवरात्रीतील पाचव्या दिवशी पिवळा हा रंग खास ठरणार आहे. हा दिवस देवी स्कंदमातेला समर्पित असून भक्त या दिवशी तिच्या या रुपाची पूजा करतील. पिवळा रंग हा आनंद, आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानला जातो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद मागू शकता.

सहावा दिवस – हिरवा रंग

सणाच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची पूजा केली जाणार असून हिरवा हा या दिवसासाठीचा प्रमुख रंग असणार आहे. लक्षात घ्या, हिरवा रंग हा वाढ, शांती आणि समृद्धीचे प्रतीक ठरतो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे जीवनात स्थिरता आणि संतुलन मिळाने यासाठी प्रार्थना करु शकता.

सातवा दिवस – राखाडी रंग

नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रि देवीची पूजा केली जाते. हे देवीच्या रुपांमधील सर्वात धैर्यशील रुप आहे. राक्षसांचा संहार करण्यासाठी देवीने कालरात्रीचे रुप धारण केले होते. राखाडी हा या दिवसासाठीचा प्रमुख रंग असणार आहे. हा रंग संतुलन आणि स्थिरतेचे प्रतीक ठरतो. गरबा नाईट्सला जाताना प्रत्येक दिवशी खास आणि शुभ ठरणाऱ्या या रंगाचे कपडे परिधान करा आणि सणाचा आनंद लुटा.

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

आठवा दिवस – जांभळा रंग

नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागाैरीची पूजा-अर्चा केली जाणार असून जांभळा रंग या दिवसासाठी खास ठरला आहे. हा रंग ज्ञान, अध्यात्म आणि आंतरिक शांतीचे प्रतीक ठरतो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे ज्ञान, यश आणि आशीर्वादासाठी प्रार्थना करु शकता. लक्षात घ्या, नवरात्रीतील प्रत्येक रंग हा देवीच्या विशिष्ट रूपाचे आणि तिच्या गुणांचे प्रतिनिधित्व करत असतो ज्यामुळे सणात या रंगाचे महत्त्व खूप जास्त आहे.

नववा दिवस – मोरपिसी रंग

सणातील शेवटचा नववा दिवस हा देवी सिद्धिदात्रीला समर्पित आहे. हा रंग उत्साह, सुसंवाद आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. या रंगाचे कपडे परिधान करुन तुम्ही देवीकडे शांती आणि आनंदासाठी प्रार्थना करु शकता. लक्षात घ्या, नवरात्रीतील प्रत्येक रंग हा देवीच्या विशिष्ट रूपाचे आणि तिच्या गुणांचे प्रतिनिधित्व करत असतो ज्यामुळे सणात या रंगाचे महत्त्व खूप जास्त आहे.

Web Title: Navratri 2026 nine colors of navratri shubh rang nine days nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • lifestyle news
  • Navratri
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?
1

Saptashrungi Shaktipeeth: सप्तशृंगी देवीला ‘अर्धशक्तिपीठ’ का म्हणतात? १८ हातांनी भक्तांना आशीर्वाद देणाऱ्या मातेचं महत्त्व काय?

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच
2

Navratri 2026: नवरात्रीचे ९ दिवस, ९ रंग आणि हटके पारंपरिक लूक! पारंपरिक लूकला द्या मॉडर्न टच

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर
3

Navratri 2026: नवरात्रीच्या आधी त्वचेवर येईल गोल्डन ग्लो! त्वचेची काळजी घेण्यासाठी ‘या’ फेसपॅकचा आवर्जून करा वापर

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा
4

Navratri Special Look: गरबाऱ्साठी परफेक्ट लुक हवाय? तर आताच सेलिब्रिटींचे हे एथनिक लुक बुकमार्क करून ठेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.