(फोटो सौजन्य: Pinterest)
देवी शैलपुत्री, काशी
हिमालयाची पुत्री म्हणून शैलपुत्री देवीला ओळखले जाते. एका मान्यतेनुसार, आपल्या जन्मानंतर देवी शैलपुत्री काशी या ठिकाणी आली होती आणि तिथेच ती विराजमान झाली. नवदुर्गेच्या प्रथम रुपातील शैलपुत्रीचे मंदिर तुम्हाला काशी घाटावर पाहायला मिळेल.
देवी ब्रह्मचारिणी, वाराणसी
उत्तर प्रदेशातच वाराणसी या ठिकाणी तुम्हाला देवीच्या दुसऱ्या रुपाचे म्हणजेच ब्रह्मचारिणीचे मंदिर पाहायला मिळेल. सांगितलं जात की, कठोर तपश्चर्येनंतर देवी ब्रह्मचारिणीने शिवाला आपले पती म्हणून प्राप्त केले होते. वाराणसीच्या बालाजी घाटावर तुम्हाला ब्रह्मचारिणीचे मंदिर दिसेल.
Significance of Navratri Nights: ‘नवरात्री’ असं नाव का पडलं? देवीच्या या …
देवी चंद्रघंटा, प्रयागराज
देवीचे तिसरे रुप म्हणजे चंद्रघंटा, याचे मंदिर देखील तुम्हाला उत्तर प्रदेशातील प्रयागराज या ठिकाणी पाहायला मिळेल. या देवीची खासियत म्हणजे तिच्या डोक्यावर घंटा आकाराचा चंद्रकोर आहे. प्रयागराजमध्ये देवीचे मंदिर वसले असून त्याला हे क्षेमा माई मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
देवी कूष्मांडा मंदिर, कानपुर
नवदुर्गेच्या चाैथ्या रुपाचे नाव आहे कूष्मांडा. कानपुरच्या घाटमपूर ब्लॉकमध्ये या देवीचे मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. मानले जाते की, देवीच्या या रुपाने आपल्या आतमध्ये संपूर्ण ब्रम्हांड सामावून घेतले आहे आणि म्हणूनच तिला कुष्मांडा हे नाव पडले.
देवी स्कंदमाता मंदिर, वाराणसी
देवीच्या पाचव्या रुपाचे नाव आहे स्कंदमाता. याचे प्राचीन मंदिर तुम्हाला वाराणसी येथे पाहायला मिळेल. देव स्कंद याची आई असल्याकारणाने या रुपाचे नाव स्कंदमाता असे पडले. वाराणसीतील मंदिराव्यतिरिक्त हिमाचल प्रदेशातील खाखनाल स्कंदमातेचे एक गुफा मंदिर देखील आहे.
देवी कात्यायनी मंदिर, अवेर्सा
दुर्गा देवीचे सातवे रुप ज्याचे नाव आहे कात्यायनी, याचे प्रसिद्ध मंदिर कर्नाटकातील अंकोलाजवळ अवेर्सा येथे वसले आहे. त्याचबरोबर मथुरा येथे भूतेश्वरमध्ये कात्यायनी वृंदावन शक्तीपीठ आहे. मान्यता आहे की, या ठिकाणी देवी सतीचे केस पडले होते. ऋषि कात्यायन यांची पुत्री असल्याकारणाने देवीला कात्यायनी हे नाव पडल्याचे सांगितले जाते.
देवी कालरात्रि मंदिर, वाराणसी
कालरात्री हे देवीचे सातवे रुप आहे ज्याचे मंदिर देखील तुम्हाला वाराणसी या ठिकाणी पाहायला मिळेल. देवीचे हे रुप संकटाचा विनाश करण्यासाठी लोकप्रिय आहे. या रुपात देवीने अनेकदा राक्षसांचा वध केला होता ज्यामुळे तिला कालरात्रि हे नाव पडले. या देवीची पूजा ही रात्रीच केली जाते.
Navratri 2026: नवरात्रीत उपवास करताय? ‘या’ चुका करू नका, जाणून घ्या …
देवी महागौरी मंदिर, लुधियाना
देवी मातेचे हे रुप शुभ्र पांढऱ्या रंगात आहे आणि म्हणूनच तिला महागाैरी हे नाव पडले. आठव्या रुपातील देवीचे हे मंदिर पंजाब राज्यातील लुधियाना या ठिकाणी पाहायला मिळते. तसेच उत्तर प्रदेशातील वारणसीमध्येही महागौरीचे एक मंदिर वसले आहे. असे मानले जाते की, शिवाच्या प्राप्तीसाठी तप करताना देवीचा रंग काळा पडला होता, तथापि आदिदेव शंकराने पुन्हा देवीचा रंग पांढरा केला.
देवी सिद्धिदात्री मंदिर, सतना
शेवटचे आणि देवीचे नववे रुप आहे सिद्धिदात्री. मध्य प्रदेशातील सतना येथे देवीच्या नवव्या रुपाचे म्हणजेच सिद्धिदात्रीचे मंदिर पाहायला मिळते. छत्तीसगढमधील देवपहाडी या ठिकाणीही देवीचे मंदिर आहे. देवीच्या या रूपाची पूजा केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात असे मानले जाते. यावरुन या देवीच्या या रिुपाचे नाव सिद्धिदात्री असे पडले आहे.






