नीता अंबानींचा रॉयल लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नीता अंबानी त्यांचे पती मुकेश यांच्यासोबत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या डेब्यू शो ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’च्या स्क्रीनिंगसाठी पोहोचल्या. मनिष मल्होत्राने डिझाईन केलेल्या साडीमध्ये नीता अंबानी यांचे सौंदर्य इतके खुलले होते की, त्यांच्या दोन्ही सुना श्लोका अंबानी आणि राधिका अंबानी यांचा लुक अक्षरशः फिका पडलेला दिसला.
मिसेस अंबानी साडीमध्ये एका जबरदस्त लुकमध्ये दिसल्या आणि सोशल मीडियावर त्यांच्या लुकला खूप प्रतिसाद मिळत आहे. नीता अंबानी अनेकदा त्यांच्या अनोख्या साडी लुकने लोकांचे मन जिंकतात. त्यांचा साधा लुकदेखील अत्यंत रॉयल टच दिल्यासारखा होता. त्यांच्या साडीच्या डिझाइनपासून ते त्यांच्या नेकलेसच्या पॅटर्नपर्यंत सर्व काही चर्चेत आले आहे. नीता अंबानी यांचा लुक आपण डिकोड करूया
नीता अंबानी यांची साडी
नीता अंबानी यांनी स्क्रीनिंगसाठी मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली एक सुंदर जेड ग्रीन टिश्यू सिल्क साडी नेसली होती. साडीला सुंदर कॉन्ट्रास्टसह नाजूक चँटिली लेस ब्लाउजसह जोडले होते, जे सुंदर स्वारोवस्की क्रिस्टल्सने सजवले होते. या साडीत नीता अंबानी खूपच सुंदर दिसत होत्या. या साध्या साडीचा प्रत्येक तपशील खास होता. ही साडी मनीष मल्होत्राने डिझाईन केली असून सुंदरता आणि समकालीन फॅशनचे एक उत्तम उदाहरण आहे.
भारतीय संस्कृतीतील ‘चिकनकारी’ साडीत नीता अंबानीने वाढवली बॉस्टनमध्ये शान, दिसल्या जणू सौंदर्याची खाण
नेकलेसने डोळेच दिपले
नीता अंबानींच्या साड्यांसह त्यांच्या उत्कृष्ट दागिन्यांच्या संग्रहासाठीदेखील अनेकदा कौतुकास्पद ठरल्या आहेत. त्यांच्या अलिकडच्या लुकमध्ये, त्यांच्या मौल्यवान हिऱ्यांनी जडवलेल्या नेकलेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नीता अंबानींनी साडीला एका अनोख्या, दुर्मिळ परैबा फुलांच्या नेकलेससह जोडले, ज्यावर नीलमणी टायटॅनियमने सजवले आहे. मौल्यवान हिऱ्यांनी जडवलेल्या या फुलाची अनोखी रचना साडीला पूरक आहे. नीता अंबानींचा हा अनोखा नेकलेस हृदयाच्या आकाराच्या स्टड इअररिंग्जसह जोडला गेला आहे. हिऱ्यांनी सजलेला हा नेकलेस पाहून तुमचे डोळे नक्कीच दिपतील.
क्लासी आणि रॉयल मेकअप
नीता अंबानी यांनी नेहमीप्रमाणे आकर्षक आणि क्लासी मेकअप केलेला दिसून आले आहे. न्यूड मेकअपचा त्यांनी आधार घेतला असून बेसिक फाऊंडेशन बेस, डार्क आयब्रो, काजळ, आयलायनर, आयलॅशेस आणि गालावर हायलायटर लावले आहे. शिवाय पिंक ब्लश आणि ओठावर न्यूड पिंक लिपस्टिक शेड लावत त्यांनी लुक पूर्ण केलाय. नेहमीप्रमाणे तरूण हिरॉईन्सना मागे टाकेल असा लुक नीता अंबानी यांचा दिसून येत आहे.
मनिष मल्होत्राची पोस्ट