नीता अंबानी यांचा क्लासी लुक (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
नीता अंबानी यांनी एनएमएसीसी येथे द फँटम ऑफ द ऑपेराच्या भव्य उद्घाटनाला हजेरी लावली. हॉलिवूडमधील पाहुण्यांसोबत नीता अंबानी यांनी नेहमीप्रमाणे साडीतील त्यांच्या लुकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नेहमीच जड आणि भरजरी कामाच्या साड्यांमध्ये दिसणाऱ्या नीता यांनी या कार्यक्रमात मोका कॉफी कलरची साडी परिधान केली होती. तसेच, यावेळी केसांमध्ये नेहमी गजरा घालणाऱ्या नीता अंबानी यांचा लुक त्यांच्या मागील लुकपेक्षा खूपच वेगळा होता.
नीता अंबानीचा प्रत्येक लुक अद्भुत असला तरी, त्या ज्या पद्धतीने तिच्या केसांच्या स्टायलिंग आणि मेकअपची काळजी घेते ते खरोखरच कौतुकास्पद आहे. नीता अंबानी साडी नेसल्यावर नेहमीच केसांमध्ये गजरा माळताना दिसतात, मग ती अंबाडा असो किंवा वेणी. पण यावेळी कार्यक्रमादरम्यान, नीता अंबानी त्यांच्या मेकअप आणि केसांची वेगळी स्टाईल करत पुन्हा एकदा स्वतःकडे लक्ष वेधून घेतले आहे, आपण या लेखात त्यांचा लुक डिकोड करूया.
भारतीय संस्कृतीतील ‘चिकनकारी’ साडीत नीता अंबानीने वाढवली बॉस्टनमध्ये शान, दिसल्या जणू सौंदर्याची खाण
नीता यांनी नेसली वेगळी साडी
नीता अंबानी बहुतेकदा जड आणि भरतकाम केलेल्या साड्या परिधान करताना दिसतात, तर यावेळी त्या साध्या प्लेन अशा चॉकलेट कॉफी रंगाची साडी परिधान करून सर्वांचे लक्ष वेधले. ६० वर्षांच्या नीता सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये छान दिसतात यात काही शंका नाही. यावेळी नीता यांनी आपल्या स्टाईलमध्ये मात्र थोडा बदल केलेला दिसून आला आहे.
जर तुम्ही लक्षात घेतले असेल तर, नीता अंबानी प्रत्येक लुकमध्ये नो मेकअप लुक ठेवतात आणि लिपस्टिकसाठी गुलाबी रंगाचे न्यूड शेड्स वापरताना दिसतात. पण यावेळी नीता अंबानी यांनी ओठांवर पीच कलर शेडचा लिपग्लॉस लावला होता आणि फारच ग्लॉसी लुक केला होता. ही शेड नीता यांच्या चेहऱ्यावर अधिक उठावदार दिसत आहे. मनिष मल्होत्राने ही साडी डिझाईन केली असून या साडीबाबत त्याने आपल्या इन्स्टाग्राम पेजवर माहितीही दिली आहे, त्याने नीता अंबानी यांच्या लुकचे विविध फोटोही पोस्ट केले आहेत.
वय वर्ष 60, नीता अंबानींचा Annual Day साठी देशी बनारसी साडीचा थाट
नीता यांच्या केसांचा लुक
जर आपण नीता अंबानीच्या केसांच्या लुकबद्दल बोललो तर, दरवेळीप्रमाणे त्यांनी हेअरस्टाईल करताना अंबाडाच घातला होता, परंतु यावेळी जे वेगळे होते ते म्हणजे त्यांच्या केसांचा रंग. तपकिरी साडी नेसून हसत असलेल्या नीता, तिच्या केसांवर गोल्डन ब्राऊन कलर चमकत होता जो त्यांच्या लुकला अधिक अभिजात आणि सुंदरता आणून देत होता. याशिवाय तिने या साडीसह घातलेला ब्लाऊज हा संपूर्णतः थ्रेडने शिवण्यात आला असून खूपच सुंदर आणि आकर्षक स्टायलिश दिसत होता. कोणत्याही समारंभासाठी तुम्ही नीता अंबानी यांच्यासारखा लुक नक्कीच निर्माण करू शकता.