Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nita Ambani: नथ, चांदबालीचा शाही हार, तब्बल 3 वर्षात झाला तयार; नीता अंबानीच्या नेकलेसने दिपतील डोळे

Nita Ambani: गणेश चतुर्थीच्या सोहळ्यासाठी नीता अंबानीने नेहमीप्रमाणे पारंपरिक साडीचा लुक केला. पण यावेळी घातलेल्या हाराने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तब्बल ३ वर्ष हा हार तयार करून घ्यायला लागले.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 16, 2026 | 11:51 AM
नीता अंबानीच्या नेकलेसने वेधून घेतलं लक्ष (फोटो सौजन्य - Instagram)

नीता अंबानीच्या नेकलेसने वेधून घेतलं लक्ष (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Follow Us:
  • गणेश चतुर्थीच्या सोहळ्यासाठी, नीता अंबानींनी एका पारंपरिक साडीसोबत एक अनमोल जडित नेकलेस परिधान केला होता
  • खांद्यापासून खांद्यापर्यंत पसरलेला हा नेकलेस खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे
  • या नेकलेसची खास वैशिष्ट्ये आणि नीता अंबानी नेकलेसच्या तपशिलांबद्दल जाणून घ्या
Nita Ambani: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने, अंबानी कुटुंबाचे निवासस्थान, ‘अँटिलिया’, नेहमीप्रमाणेच सजावट, परंपरा आणि सेलिब्रिटींच्या उपस्थितीने गजबजले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील स्टार्सची मंदियाळी दिसून आली. पण या सगळ्यात नेहमीप्रमाणे नीता अंबानींची पारंपरिक शैली उठून दिसत होती. त्यांनी केशरी आणि मॅजेंटा रंगाची चमकदार रेशमी साडी नेसली होती, आणि त्यासोबत घातलेल्या भव्य नेकलेसमुळे त्यांचा संपूर्ण लुक अधिकच खुलून दिसत होता. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या नेकलेसचीच चर्चा अधिक रंगली आहे. कसा आहे हा नेकलेस आणि हा तयार करायला किती वेळ लागला आपण आज जाणून घेऊया. 

फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

काय आहे नेकलेसची खासियत 

३ वर्ष हार बनवायला लागली

हा काही साधासुधा नेकलेस नाही. ‘आम्रपाली भरतम’ हा नेकलेस विविध भारतीय दागिन्यांच्या परंपरांचा मिलाफ करून तयार करण्यात आला आहे. पहिल्याच नजरेत असे वाटते की, अनेक पिढ्यांचा वारसा एकाच नेकलेसमध्ये सामावला आहे. म्हणूनच नीता अंबानी यांचा गणेशोत्सवातील लुक केवळ रंग किंवा साडीमुळेच नव्हे, तर या अद्वितीय, राजेशाही आणि भव्य नेकलेसमुळेही चर्चेचा विषय बनला.

तीन वर्षांत गोळा केलेले पुरातन दागिने

या नेकलेसची कहाणी त्याच्या चमकपेक्षाही अधिक रंजक आहे. या ब्रँडने भारतातील विविध भागांतून पुरातन आणि दुर्मिळ दागिने गोळा करण्यासाठी जवळपास तीन वर्षे घालवली. त्यानंतर चौदा कुशल कारागिरांनी सुमारे सहा महिने काम करून हे वेगवेगळे भाग अखंडपणे एकत्र जोडून एकसंध कलाकृती तयार केली.

याचे वैशिष्ट्य म्हणजे यात असे दागिने वापरले आहेत जे मूळतः नेकलेससाठी बनवलेले नव्हते. झुंबर, दक्षिण भारतीय नथ, पासा, कानातले, बॅजेस आणि चांदबाली यांसारख्या विविध दागिन्यांमधील भाग या नेकलेसमध्ये समाविष्ट केले आहेत. नेकलेसच्या मध्यभागी केरळ-शैलीतील एक पारंपरिक हारही जोडला आहे. हिरे, माणिक, पाचू आणि मोत्यांची चमक त्याच्या भव्यतेत भर घालते. नीता अंबानींचा लुक हा दरवर्षीप्रमाणेच चर्चेचा ठरला आहे. 

नीता अंबानींचा वाढदिवस उत्साहात साजरा; गुलाबी सूटमध्ये दिसला ग्लॅमरस लूक, टीमने दिले सरप्राईज

सोनम कपूरनेही हा नेकलेस घातला आहे

सोनम कपूरने नोव्हेंबर २०२५ मध्ये तिच्या मॅटर्निटी फोटोशूट दरम्यान हाच नेकलेस घातला होता. तिने तो पांढऱ्या आणि सोनेरी रंगाच्या चोगा आणि धोती सूटसोबत परिधान केला होता. याचा अर्थ, एकच दागिना दोन वेगवेगळ्या प्रसंगी दोन पूर्णपणे भिन्न शैलींमध्ये दिसला. नेकलेस तोच असूनही, त्याची शैली पूर्णपणे नवीन आणि अद्वितीय होती. भारतीय परंपरा असणारा हा नेकलेस कमालीचा सुंदर आणि आकर्षक आहे. 

 

Web Title: Nita ambani wore jadau necklace looks regal elegant for ganesh chaturthi pooja

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 11:51 AM

Topics:  

  • fashion tips
  • Ganeshotsav 2026
  • Nita Ambani

संबंधित बातम्या

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया
1

Gauri Aagman 2026: फुले, दिवे आणि कापडाने घरच्या घरी करता येतील ‘या’ भन्नाट आयडिया

Tasgaon Ganpati Rathotsav: तासगावच्या गणरायाचा २८७ वा रथोत्सव; पारंपरिक जल्लोषात निघाला भव्य रथ
2

Tasgaon Ganpati Rathotsav: तासगावच्या गणरायाचा २८७ वा रथोत्सव; पारंपरिक जल्लोषात निघाला भव्य रथ

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण
3

Virar News: ‘हिंदूंच्या सणांना बंदी का?’ विरारच्या कोपरीत गणेश विसर्जनावरून ग्रामस्थ आक्रमक, तणावाचे वातावरण

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी
4

Ganeshotsav 2026: गणपतीच्या नैवेद्याला महागाईचा फटका; मावा-चॉकलेटसह या मोदकांना मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.