रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी कायमच त्यांच्या फॅशनमुळे चर्चात असतात. त्यांचे इंडियन, वेस्टन, ट्रॅडीशन लुक सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. नीता अंबानींच्या साड्या केवळ फॅशन लुक नाहीतर भारतीय संस्कृती आणि कारागिरांच्या कलेचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या कायमच वेगवेगळ्या प्रांतातील हातमागावर विणलेल्या साड्या नेसण्यास जास्त पसंती दर्शवतात. नीता अंबानी यांच्या साडी कलेक्शनमध्ये भारतीय हस्तकला, हस्तलिखित डिझाइन्स आणि पारंपारिक विणकामाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. त्यांच्या साड्या मनिष मल्होत्रा आणि अबू जानी-संदीप खोसला यांसारख्या प्रसिद्ध डिझायनर्सनी तयार केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया नीता अंबानींच्या साड्यांची खास वैशिष्ट्य.(फोटो सौजन्य – instagram)
फॅशन आयकॉन नीता अंबानींच्या साड्यांचा शाही अंदाज! साड्या केवळ फॅशन नसून भारतीय हातमाग कलेचे जिवंत प्रदर्शन, जाणून घ्या वैशिष्ट्य

नीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये महाराष्ट्राची शान असलेली पैठणी, बनारसी, पटोला, जामदानी, कांजीवरम, चिकनकारी यांसारख्या पारंपरिक आणि अस्सल भारतीय विणकाम करून तयार केलेल्या साड्या आहेत.

साड्यांवर केलेले गुंतागुंतीचे विणकाम करायला तब्बल १० महिने ते २ वर्षांचा कालावधी लागतो. मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या साड्यांपैकी एक असलेली रंगकट बनारसी साडी खूप फेमस आहे.

मनिष मल्होत्रा आणि तरुण तहिलियानी यांसारखे प्रसिद्ध डिझायनर नीता अंबानींच्या साड्या आणि ब्लाऊजला रॉयल, स्टायलिश आणि हटके लुक देतात.

गडद जांभळी, राणी गुलाबी, रॉयल ब्लू, आणि लाल यांसारख्या राजेशाही रंगाच्या साड्या नीता अंबानी प्रामुख्याने नेसताना दिसतात. पारंपरिक हातमागावर विणकाम करून तयार केलेल्या साड्या कारागिरांच्या कलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

नीता अंबानींच्या साड्यांमध्ये 'शांत लक्झरी' पाहायला मिळते. भरजरी जडत्वापेक्षा उत्कृष्ट कारागिरी आणि धाग्यांची गुणवत्ता अतिशय महत्वाची मानली जाते.






