Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Oral Hygiene: दात घासून सुद्धा तोंडाला घाणीचा वास येतो? मग ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, इन्फेक्शनमुळे होईल नुकसान

Oral Hygiene: हिरड्यांचे आजार किंवा अन्नपदार्थांचे कण दातांमध्ये तसेच साचून राहिल्यामुळे तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. पण ब्रश केल्यानंतर सुद्धा दुर्गंधीचा घाण वास येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 12, 2026 | 08:12 AM
दात घासून सुद्धा तोंडाला घाणीचा वास येतो? मग 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, बॅक्टेरिया इन्फेक्शन वाढून होईल नुकसान

दात घासून सुद्धा तोंडाला घाणीचा वास येतो? मग 'या' लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, बॅक्टेरिया इन्फेक्शन वाढून होईल नुकसान

Follow Us
Follow Us:

तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाय:
बॅक्टेरिया वाढण्याची कारणे?
दात घासल्यानंतर दुर्गंधी येण्याची कारणे?

Oral Hygiene: सकाळी उठल्यानंतर तोंडातून वास येणे ही अतिशय सामान्य समस्या आहे. पण ब्रश केल्यानंतर सुद्धा तोंडातून घाणीचा वास येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत. जिभेवर साचलेला थर, हिरड्यांचे आजार, दात किडणे, तोंडाचा कोरडेपणा आणि दातांमध्ये अडकलेले अन्नाचे बारीक कण इत्यादी अनेक गोष्टींमुळे दातांच्या समस्या वाढू लागतात. तोंडातून येणारा घाणीचा वास लपवण्यासाठी माऊथ वॉश किंवा मिंटच्या गोळ्या सुद्धा खाल्ल्या जातात. या समस्येला वैद्यकीय भाषेत हॅलिटोसिस असे सुद्धा म्हंटले जाते. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणेधोक्याचे ठरू शकते. ब्रश करून सुद्धा तोंडातून दुर्गंधीचा वास येत असेल तर हे उपाय नक्की करून पहा. यामुळे दुर्गंधीपासून सुटका मिळेल.(फोटो सौजन्य – istock)

Panic Attack आल्यानंतर घाबरून न जाता लगेच करा ‘या’ गोष्टी, हृदयाचे वाढलेले ठोके व भीती होईल कमी

सकाळी उठल्यानंतर तोंडातून दुर्गंधी येण्याची कारणे:

तोंडातील लाळ नैसर्गिक स्वच्छता यंत्र म्हणून काम करते. अन्न पदार्थांचे कण वाहून नेणे, ॲसिडिटी नियंत्रित करते आणि जिवाणूंची वाढ रोखण्यास मदत करते. पण रात्रीच्या वेळी झोपताना लाळेची निर्मिती, घास गिळण्याची क्रिया आणि जिभेची हालचाल लक्षणीयरीत्या कमी होऊन जाते. ज्याच्या परिणामामुळे तोंडात कोरडेपणा वाढतो. हिरड्यांच्या आजूबाजूला असणारे जिवाणू अन्नाचे अवशेष, लाळ आणि मृत पेशी प्रथिनांचे विघटन करतात. ज्याच्या परिणामामुळे हायड्रोजन सल्फाईड आणि मिथाईल मर्कॅप्टन हे दुर्गंधी आणि सल्फर युक्त वायू तोंडातून बाहेर पडतात, ज्याच्या परिणामामुळे सकाळी उठल्यानंतर तोंडातून दुर्गंधीचा घाण वास येतो.

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी का कमी होत नाही?

जिभेवर साचलेला जिवाणूंचा थर
दातांमध्ये वाढलेल्या फटी
हिरड्यांचे आजार
हिरड्यांमधून रक्त येणे.
कृत्रिम दात, क्राउन किंवा ब्रिजची व्यवस्थित स्वच्छता न होणे
तोंडामध्ये सतत कोरडेपणा जाणवणे इत्यादी अनेक गोष्टींच्या परिणामामुळे ब्रश केल्यानंतर सुद्धा तोंडातून घाणीचा वास येतो.

मॅग्नेशियमची कमतरता पडू शकते महाग! जाणून घ्या शरीरासाठी का महत्त्वाचे आहे हे पोषक तत्व?

तोंडात वाढलेली दुर्गंधी कमी करण्यासाठी उपाय:

दिवसभरातून दोनदा ब्रश केल्यास तोंडातील विषाणू नष्ट होऊन दुर्गंधीपासून सुटका मिळेल. याशिवाय फ्लोराईडयुक्त टूथपेस्टचा वापर करावा. टंग स्क्रॅपरने जिभेचा मागचा भाग हळुवार साफ केल्यास जिभेवर साचून राहिलेला पांढरा थर बाहेर पडून जातो. नियमित भरपूर पाणी आणि शरीरास आवश्यक असलेला पोषक आहार घेणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. माऊथ वॉश केवळ तात्पुरता सुगंध देतो. त्यामुळे दातांच्या समस्या वाढल्यानंतर वेळीच लक्ष देऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: दात घासूनही तोंडाला दुर्गंधी का येते?

    Ans: दातांवर साचलेला प्लाक, जीभेवर जमा झालेले बॅक्टेरिया, हिरड्यांचा संसर्ग, तोंड कोरडे राहणे किंवा दातांच्या इतर समस्यांमुळे ब्रश केल्यानंतरही दुर्गंधी येऊ शकते.

  • Que: तोंडाच्या दुर्गंधीसोबत कोणती लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये?

    Ans: हिरड्यांतून रक्त येणे, हिरड्या सुजणे किंवा दुखणे, दात हलणे, तोंडात सतत खराब चव येणे, पू येणे किंवा दुर्गंधी दीर्घकाळ कायम राहणे याकडे दुर्लक्ष करू नये.

  • Que: जीभ स्वच्छ न केल्याने तोंडाला वास येऊ शकतो का?

    Ans: होय. जीभेवर बॅक्टेरिया आणि अन्नकण साचल्याने दुर्गंधी वाढू शकते. त्यामुळे दातांसोबत जीभही नियमित स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Oral hygiene does your mouth smell bad even after brushing your teeth then do not ignore these symptoms at all

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • teeth home remedies
  • teeth problems
  • teeth tips

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.