(फोटो सौजन्य: istock)
How To Sharpen Knife: किचनच्या सुरीची धार कमी झालीये? ‘या’ उपायांनी काही मिनिटांत घरीच करा तीक्ष्ण
शरीरात मॅग्नेशियमची कमरता आढळल्यास काय होते?
तज्ञ सांगतात की, शरीरात मॅग्नेशियमची कमतरता आढळल्यास शरीर आपल्याला काही विशेष संकेत देत असते. तथापि, सुरुवातीला हे संकेत अनेकांना समजून येत नाही आणि लोक किरकोळ समस्या मानून त्याकडे दुर्लक्षित करतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीरात थकवा जाणवणे, भूक कमी लागणे, स्नायूंमध्ये पेटके आणि ताण जाणवू लागणे अशा समस्या उद्भवू शकतात. तथापि, मॅग्नेशियमची ही कमतरता जर वाढली तर याचा आपल्या नसांवर, हृदयावर आणि स्नायूंवर वाईट परिणाम होऊ शकतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये झटके येणे, हृदयाचे ठोके चुकणे अशा समस्या देखील जाणवू शकतात. यामुळेच शरीरात जर बऱ्याच काळापासून सतत ही लक्षणे दिसून येत असतील तर तत्काळ यावर उपाय करायला हवा.
मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कॅन्सरचा त्रास जाणवतो का?
सध्या तरी मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे कॅन्सर होऊ शकतो असे आपण म्हणू शकत नाही. तथापि, काही संशोधनात मॅग्नेशियमचा स्तर कमी झाल्याने काही प्रकारे कॅन्सरचा धोका वाढल्याचे समोर आले आहे. मॅग्नेशियम शरीरावरील सूज नियंत्रित करण्यात, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मॅनेज करण्यात आणि डीएनए दुरुस्ती यांसारख्या प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. तथापि, यावरील संशोधनात अद्याप अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत ज्यामुळे कोणतेही निष्कर्ष देण्यासाठी योग्य आणि पूर्ण संशोधनाची गरज आहे. सध्याच्या स्थितीला आपल्या शरीरात मॅग्नेशियमची पुरेशी पातळी राखणे ओव्हरऑल हेल्थसाठी फायद्याचे ठरेल.
Ganesh Chaturthi 2026 : भारतातील 5 सुप्रसिद्ध गणपती पंडाल, एकदा तरी नक्की भेट द्या
मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी काय करावे?
मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्हाला बाजारातून काही विकत घेण्याची गरज नाही. घरी उपलब्ध असलेल्या अनेक पदार्थांमध्ये मॅग्नेशियमचा उत्तम स्त्रोत आढळून येतो. तुम्ही तुमच्या आहारात बदाम, हिरव्या पालेभाज्या, विशेषतः पालक, सुकामेवा, भोपळ्याच्या बिया आणि तीळ यांचा समावेश करु शकता. यासोबतच राजमा, हरभरा, बाजरी आणि नाचणी यातूनही मॅग्नेशियमची पातळी भरुन काढली जाऊ शकते. डार्क चाॅकलेटचे सेवनही यासाठी फायद्याचे ठरेल.






