नारळ पाण्याचे अतिसेवन ठरेल आरोग्यासाठी घातक
नारळ पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह त्वचा आणि केसांनासुद्धा गुणकारी फायदे होतात. नारळ पाण्यात नैसर्गिक गोडवा असल्यामुळे मधुमेहासह इतर समस्या असलेले लोकसुद्धा नारळ पाण्याचे सेवन करू शकतात.अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी किंवा इतर कारणांमुळे साखर युक्त पदार्थांचे सेवन न करता नारळ पाणी पिण्यास प्राधान्य देतात. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार राहते. नारळ पाण्यात सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. पण जास्त प्रमाणात नारळ पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अतिप्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे आरोग्यावर कोणते परिणाम दिसून येतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
जास्त प्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे शरीरात पोटॅशियमची पातळी वाढते. तसेच अतिप्रमाणात नारळ पाणी प्यायल्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, उच्च रक्तदाब आणि किडनीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नारळ पाण्याचे सेवन करावे. ज्यांना हृदय किंवा मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नारळ पाण्याचे सेवन करावे.
हे देखील वाचा: दिवसभराचा थकवा होईल दूर, अशी करा आंघोळ
इतर पेयांच्या तुलनेत नारळ पाण्यात खूप कमी कॅलरी असतात. पण नारळ पाण्याच्या अतिसेवनामुळे या कॅलरी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमचे वजन झपाट्याने वाढू शकते.वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी कमीत कमी नारळ पाण्याचे सेवन करावे.
नारळ पाण्याचे अतिसेवन ठरेल आरोग्यासाठी घातक
नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ लागतात. त्यामुळे कमीत कमी नारळ पाणी प्यावे. उच्च पोटॅशियम अल्डोस्टेरॉनच्या स्राववर परिणाम करतात. तसेच टेस्टोस्टेरॉनच्या पातळीवर परिणाम झाल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
हे देखील वाचा: कितीही खाल्लं तरीसुद्धा वजन वाढत नाही? मग नैसर्गिकरित्या वजन वाढवण्यासाठी ‘हे’ पदार्थ खा
नारळ पाण्याच्या अतिसेवनांमुळे पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. तसेच गॅस, फुगवणे किंवा इतर पचन समस्या उद्भवू शकतात. ज्या व्यक्तींना कोणत्याही आजारांबद्दल औषध चालू असतील अशांनी नारळ पाणी पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.