
व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंटने (Anti Oxidant) भरलेले अननस (Pineapple) वजन कमी करण्यासाठी औषधासारखे काम करते. अननस शरीराच्या अनेक आजारांवर औषधापेक्षा चांगले काम करते. अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे.
जर तुम्हाला तुमचे वजन कमी (Weight loss) करायचे असेल तर व्यायामासोबत अननसाचे सेवन केल्यास तुमचे ध्येय लवकरात लवकर पूर्ण होऊ शकते. वजन राखण्यापासून ते शरीर तंदुरुस्त आणि निरोगी होण्यासाठी अननस उपयुक्त आहे. कोलेस्टेरॉल आणि हाय बीपीपासून ते हृदयविकारापर्यंत हे फळ अत्यंत उपयुक्त आहे.
अननस व्हिटॅमिन सी आणि अनेक अँटी-ऑक्सिडंट्सने परिपूर्ण आहे आणि यामुळेच ते शरीराच्या प्रत्येक भागासाठी सर्वोत्तम आहे. अननस खाल्ल्याने पोट जास्त काळ भरलेले जाणवते. हे खाल्ल्याने तुम्हाला जास्त वेळ दुसरे काहीही खावेसे वाटणार नाही, अशावेळी तुम्ही जास्त खाणे टाळाल आणि तुमचे वजनही लवकर कमी होईल. अननसात शून्य चरबी आणि फक्त 82 कॅलरीज असतात.
जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी अननस वापरत असाल तर ते नेहमी पूर्ण खाण्याचे लक्षात ठेवा. म्हणजेच साल काढल्यानंतर तुम्ही ते खा. इतर रोगांवर उपचार करताना, तुम्ही त्याचा रस देखील पिऊ शकता. सकाळी त्याचा रस किंवा फळ खाणे सर्वात प्रभावी आहे. वजन कमी करण्यासाठी अननसाचे छोटे तुकडे करून ते दह्यामध्ये मिसळून खा. त्यामुळे त्याचे पौष्टिक मूल्य वाढेल.