Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Travel: राजस्थानच्या या ठिकाणी वाळवंट दिसणार नाही, बेट आणि पर्वतांवर घेऊ शकता सुट्टीचा आनंद

राजस्थान हे ठिकाण वाळवंट आणि तेथील अतिउष्ण वातावरणामुळे ओळखले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला येथील अशा काही ठिकाणांविषयी माहिती सांगत आहोत, जिथे तुम्हाला वाळवंट नाही तर पर्वत, तलाव आणि बेटे यांचा अद्भुत अनुभव घेता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2025 | 08:25 AM
Monsoon Travel: राजस्थानच्या या ठिकाणी वाळवंट दिसणार नाही, बेट आणि पर्वतांवर घेऊ शकता सुट्टीचा आनंद

Monsoon Travel: राजस्थानच्या या ठिकाणी वाळवंट दिसणार नाही, बेट आणि पर्वतांवर घेऊ शकता सुट्टीचा आनंद

Follow Us
Follow Us:

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि तेथील ऐतिहासिक वस्तूंसाठी सुप्रसिद्ध आहेत. अनेक पर्यटक दूरदूरवरून भारतातील या सुंदर ठिकाणांना भेट देण्यासाठी येथे येत असतात. भारतात अनेक राज्य आहेत, प्रत्येक राज्यात वेगळी लोकप्रिय ठिकाणे, वेगळी परंपरा आणि अनोखा इतिहास पाहायला मिळतो. भारतातील असेच एक सुप्रसिद्ध राज्य म्हणजे राजस्थान!

आलिशान महाल आणि वाळवंटाने व्यापलेले हे राज्य तेथील ऐतिहासिक वारसासाठी आणि परंपरेसाठी ओळखला जातो. येथील ७०% भूभाग वाळवंटाने व्यापलेला आहे आणि म्हणूनच राजस्थानला “भारताचे वाळवंट राज्य” असे म्हटले जाते. राजस्थान म्हटलं की प्रत्येकाला वाळवंट आठवू लागतो मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की, येथे अशी बरीच ठिकाणे आहेत जिथे तुम्ही वाळवंट नाही तर हिरवीगार सुंदर दृश्य पाहू शकता. यंदाच्या मान्सूनमध्ये जर तुम्ही राजस्थानला भेट देण्याचा विचार केला असेल तर ही ठिकाणे तुमच्या लिस्टमध्ये असायलाच हवीत.

जगातील सर्वात लहान फ्लाइट, प्रवाशांना अवघ्या 53 सेकंदातच गंतव्यस्थापर्यंत पोहचवते…

माउंट आबू

राजस्थानमध्ये तसे हिल स्टेशन नाही मात्र माउंट आबू हे येथील एकमेव हिल स्टेशन आहे, जे समुद्रसपाटीपासून १,२२० मीटर उंचीवर आहे. इथे तुम्हाला हिरवेगार टेकड्यांचे दृश्य पाहायला मिळेल. पाइनची जंगले, थंड वारा आणि सुंदर ढग यामुळे इथे परदेशात आल्याचा भास होऊ लागतो. हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला वाळवंटाचे नमो निशाण सापडणार नाहीत. इथे बोटिंग करण्याचीही सुविधा आहे, कुटुंबासोबत इथे एक चांगला वेळ घालवता येऊ शकतो.

उदयपूर

उदयपूर हे राजस्थानमधील एक लोकप्रिय ठिकाण आहे, हे ठिकाण तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. अधिकतर लोक आपल्या लग्नाचे प्री-वेडिंग शूट करण्यासाठी या ठिकाणाला भेट देतात. इथे अनेक आलिशान राजवाडे पाहायला मिळतात. पिछोला तलावाच्या काठावर अनेक राजवाडे आहेत जे तुम्हाला राजासारखे वाटतील. तुम्ही येथे चांगली सुट्टी घालवू शकता. इथेही तुम्हाला दूरदूरवर वाळवंट अजिबात दिसणार नाही.

Goa Travel: जिथे प्रेम आणि संस्कृतीचा होतो जागर, मान्सूनमध्ये करा गोव्याची अनोखी सफर; फक्त Beach चं नाही तर आणखीन बरंच काही

बांसवाडा

जर तुम्हाला राजस्थानला भेट द्यायची असेल आणि वाळवंटाऐवजी बेट पहायचे असेल तर राजस्थानमधील बांसवाडा नावाचे एक शहर तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे. पर्यटकांमध्ये या ठिकाणाची सध्या फार क्रेझ आहे. खरंतर इथे माही नदी आहे, ज्यामध्ये सुमारे १०० सुंदर लहान बेटे आहेत. पाण्याने वेढलेली ही बेटे पाहण्यास खूप सुंदर आहेत. दूरदूरचे लोक आता येथे भेट देण्यासाठी येत आहेत.

Web Title: Places in rajasthan where you cant find desert they are full of mountains lakes and islands travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 08:25 AM

Topics:  

  • rajastan
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल
1

World Tourism Day 2026 : AI चॅटबोटपासून डिजिटल तिकिटिंगपर्यंत, महाराष्ट्र पर्यटन विभागाची ‘स्मार्ट टुरिझम’कडे वाटचाल

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून
2

ताजमहालहून अनेक पटींनी सुंदर आहे संगमरवरचे हे मंदिर, नक्षीकाम पाहून डोळे राहतील खिळून

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट
3

ट्रेनमध्ये अवाजवी सामान नेल्यास बसणार दंड! AC ते जनरल डब्यापर्यंत, जाणून घ्या प्रत्येक क्लासची लगेज लिमिट

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
4

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.