(फोटो सौजन्य: istock)
प्रवास करण्यासाठीचा सर्वात सोपा, वेगवान पर्याय म्हणजे हवाई मार्ग. विशेषतः परदेशी पर्यटन करण्यासाठी हा पर्याय निवडला जातो. दुसऱ्या देशांत जाण्यासाठी लोक अधिकतर फ्लाइटचा पर्याय निवडतात. वाहतूक व्यवस्थेत विमानसेवा महत्त्वाची भूमिका बजावते, लांब पल्ल्याचा प्रवास कमी वेळेत कापण्यासाठी फ्लाइटचा पर्याय एकदम उत्तम आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका फ्लाइटविषयी माहिती सांगत आहोत जे अवघ्या ५३ सेकंदातच गंतव्यस्थानावर पोहचवते. अंतर कापण्याच्या बाबतीत याला सर्वात लहान फ्लाइट मानले जाते. विचार करा तुम्ही डोळे मिचकवाल आणि तितक्यातच ही फ्लाइट तुम्हाला तुमच्या स्थानावर नेऊन जाईल. प्रवाशांना जगातील सर्वात लहान विमान सेवा देणारी ही विमानसेवा ‘लोगानएअर’ द्वारे चालवली जाते. ज्यामध्ये ब्रिटन-नॉर्मन BN2B-26 विमान वापरले जाते. आम्ही तुम्हाला सांगतो की, ही फ्लाइट ५० वर्षांपासून ही सर्व्हिस देत आहेत ज्यात ती प्रवाशांना काही क्षणातच गंतव्यस्थानापर्यंत पोहचवते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
53 सेकंदातच फ्लाइट पोहचवेल गंतव्यस्थानावर
सर्वप्रथम, आम्ही तुम्हाला सांगतो की आपण ज्या विमानाबद्दल बोलत आहोत ते भारतातले नसून स्कॉटलंडच्या दोन बेटांवर, वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे दरम्यान उड्डाण करते. या मार्गावर विमानाला दीड मिनिटांत प्रवास पूर्ण करावा लागतो. अशा परिस्थितीत, या विमानाला एका बेटावरून दुसऱ्या बेटावर पोहोचण्यासाठी किमान १ मिनिट लागतो, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, या विमानाच्या सर्वात जलद उड्डाणाचा विक्रम ५३ सेकंदांचा आहे.
माहितीनुसार, वेस्ट्रे आणि पापा वेस्ट्रे या दोन बेटांवरून विमान प्रवास केला जातो. एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाण्यासाठी सहसा बोटी आणि फेरी वापरल्या जातात, परंतु या दोन बेटांमधील समुद्राचे पाणी बोटी आणि फेरी चालविण्यासाठी योग्य नाही. अशा परिस्थितीत, स्कॉटलंड सरकारने १९६७ मध्ये जगातील सर्वात लहान व्यावसायिक उड्डाण सुरू करण्याचा निर्णय घेतला, जो आजही आपली सर्व्हिस प्रवाशांना पुरवत आहे.
देशभर आणि जगभरातील विमानांमध्ये क्रू मेंबर्स असले तरी, या विमानात क्रू मेंबर्स नाहीत किंवा पायलटही नाही. यासोबतच, आम्ही तुम्हाला सांगतो की एका वेळी विमानात फक्त ८ ते १० प्रवासी प्रवास करतात आणि संपूर्ण उड्डाण केवळ पायलटद्वारे चालवले जाते. तुम्हालाही जर या फ्लाइटमध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला एका प्रवासासाठी १,८६६ ते ४,९४१ रुपयांचा खर्च येऊ शकतो. सहसा यात विमान प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर ९० ते १२० सेकंदांच्या आत पोहोचवते, परंतु जर हवामानाने साथ दिली तर प्रवास ५३ सेकंदात पूर्ण करता येतो.