Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट

देव तारणारा असून चालत नाही तर तुम्हाला देखील स्वत: वाचवण्यासाठी स्वत:ची मदत करण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगण्याची अतोनात इच्छा लागते. याची साक्ष देणारा विमान अपघात. अंगावर काटा आणणाऱ्या या विमान अपघाताची गोष्ट.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 14, 2025 | 02:08 PM
फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट
Follow Us
Close
Follow Us:
  • फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती;
  • 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्..,
  • विमान अपघाताची थरारक गोष्ट
‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आपल्याकडे म्हटली जाते. खरं तर देव तारणारा असून चालत नाही तर तुम्हाला देखील स्वत: वाचवण्यासाठी स्वत:ची मदत करण्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगण्याची अतोनात इच्छा लागते. याची साक्ष देणारा विमान अपघात. अंगावर काटा आणणाऱ्या या विमान अपघाताची गोष्ट जाणून घेऊयात.

ही गोष्ट आहे 1971 मधली, अ‍ॅमेझॉनमध्ये एका भयाण वीजवादळात एक प्रवासी विमान तुकडे-तुकडे झाले. 10 हजार फुट उंचावरुन कोसळलेल्या या विमानाचे जिथे तुकडे तुकडे झाले तिथे विमानातील प्रवाशांचं काय झालं असेल याची कल्पनाही न केलेलीच बरी. या विमनात विमानात 92 प्रवासी होते मात्र यातली एक 17 वर्षाची मुलगी इतक्या मोठ्या अपघातातून बचावली. या अपघातातील ती एकमेव व्यक्ती होती जी त्यातून वाचली. या मुलीचं नाव जुलियाने कोएप्के.

विमान अपघातातून बचावलेली जुलिया आकाशातून अ‍ॅमेझॉनच्या जंगलात पडली. त्यावेळच्या तपासांती अहवालानुसार, ते विमान होते LANSA फ्लाइट 508 जे पेरूमधील लीमा येथून पुकाल्पाकडे जात होते.साक्षीदार आणि तपास अहवालांनुसार, एका वादळी ढगसमूहात वीज कोसळल्यामुळे विमानाच्या संरचनेत बिघाड झाला आणि हवेतच विमानाचे तुकडे झाले.

टोकियोतील भन्नाट कॅफे, इथे एलियन करतात कॉफी सर्व्ह; घंटी वाजवा आणि ऑर्डर घ्या

जुलियाने आपल्या सीटच्या रांगेत अडकलेलीच खाली पडली.नंतर संशोधकांनी या अपघातावर केलेल्या अभ्यासातून असं सांगितसलं की सीटची ती रांग हवेत प्रतिकार निर्माण करत होती, ज्यामुळे पडण्याचा वेग कमी झाला आणि तिच्या वाचण्याची शक्यता वाढली. मात्र जुलिया समोर खरं आव्हान पुढे होतं.

जंगलात पडल्यानंतर ती शुद्धीवर आली. इतक्या उंचीवरुन पडल्यानंतर सुजलेले डोळे, शरीरावर झालेल्या जखमा, डोळ्यांना इजा झाल्याने अंधूक दिसत होतं.तिला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते ना लोकांचे, ना इंजिनचे, ना बचावकार्याचे.चारही बाजूंनी फक्त अ‍ॅमेझॉनचं जंगल पसरलेलं होतं.

ज्या वातावरणात ती पडली होती ते होतं. पेरूमधील अ‍ॅमेझॉन जंगल. मोठ्या अपघातातून वाचल्यानंतर आता पुढे संकट होतं ते जंगली प्राण्याचं.विषारी साप.जग्वारसारखे मोठे हिंस्त्र प्राणी. परजीवी कीटक. पाण्यातील घातक जंतू त्यात भरीला भर तिच्या शरीरावर झालेल्या जखमा. दाट झाडी असल्याने सूर्य़रप्रकाश पोहोचत नव्हता.त्यामुळे काही दिसणं देखील कठीण होतं.अशा परिस्थिती ती कशी तग धरुन राहिली त्याची कल्पना देखील करवत नाही.

जुलियाने जंगल कधीच पाहिलं नव्हतं असं नव्हतं.तिचे आई-वडील जर्मन प्राणिशास्त्रज्ञ होते आणि ते जैव संशोधन केंद्रात काम करत होते.
बालपणातच तिने वनस्पती ओळखणं, धोके टाळणं आणि पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यास माणसं सापडण्याची शक्यता वाढते याचं शिक्षण तिला मिळालं होतं आणि हेच शिक्षण तिला जीव वाचवण्यासाठी कामी आलं.

अकरा दिवसांचा संघर्षमय प्रवास

तिला एक लहान ओढा सापडला आणि ती त्याच्या दिशेने चालू लागली.तो ओढा पुढे मोठ्या पाणवठ्यांपर्यंत गेला अगदी तिने शिकल्याप्रमाणे.
अन्न अत्यंत कमी होतं. पाणी प्यायला मिळालं नाही तर नक्कीच जीव जाणार हे निश्चित होतं. तिने धोका पत्करून नदीचं पाणी प्यायलं.
तिच्या जखमा अधिक खोल होत गेल्या.तिला समजलं की एका जखमेत कीटकांनी अळ्या घातल्या होत्या उष्णकटिबंधीय जंगलात हे सामान्य आहे.
तरीही ती चालत राहिली.

सुमारे अकरा दिवसांनंतर, तिला लाकूडतोड कामगारांनी वापरलेला एक साधा निवारा सापडला.
दुसऱ्या दिवशी कामगार तिथे आले. त्यांनी प्राथमिक उपचार केले.त्यानंतर तिला बोटीने अनेक तास प्रवास करून जवळच्या गावात आणि वैद्यकीय मदतीपर्यंत नेण्यात आलं.डॉक्टरांनी तिचा विमान अपघात आणि त्यातून वाचल्यानंतरचे ते 11 दिवस ती जे तग धरुन राहिली त्यावर आश्चर्य व्यक्त केलं.
बचावानंतरजुलियाची तिच्या वडिलांशी भेट झाली.दुर्दैवाने, तिची आई त्याच विमानात होती आणि त्यात ज्युलियाच्या आईचा मृत्यू झाला.

ज्या कठीण परिस्थितीतून ज्युलियाला दोनदा मिळालेला हा पुनर्जन्म होता. त्यानंतर जुलियाने जीवशास्त्र हे क्षेत्र निवडलं, डॉक्टरेट पूर्ण केली आणि अ‍ॅमेझॉनशी संबंधित संशोधनात योगदान दिलं.तिची कथा शैक्षणिक अभ्यास, माहितीपट आणि तिच्या आत्मचरित्रातून जगासमोर आली.

जुलियाच्या जगण्याकडे अनेकदा पुढील उदाहरण म्हणून पाहिलं जातं. कारण तिचं फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर तिची जगण्याची जिद्द देखील होती.तिला जीव वाचवण्यासाठी ज्ञान हे सर्वात प्रभावी साधन ठरलं. शांत निर्णयक्षमतेने तिने भीतीवर मात केली.प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी तयारी दाखवली. फक्त शारीरिक ताकदीमुळेच ती वाचली नाही. शिक्षण आणि निर्भीड वृत्तीमुळे ती तग धरु शकली. ज्युलिया आज अनेकांना जगण्यासाठी प्रेरणा देत आहे.

नवीन वर्षी 7000 रुपयांत बाली तर फक्त 8000 रुपयांत फिरा बँकॉक; प्रवासाचा सर्वात स्वस्त मार्ग काय आहे ते जाणून घ्या

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: जुलियाने कोएप्के कोण होती?

    Ans: जुलियाने कोएप्के ही 17 वर्षांची जर्मन वंशाची मुलगी होती. 1971 साली पेरूमधील अमेझॉन जंगलात झालेल्या भीषण विमान अपघातातून ती एकमेव जिवंत बचावलेली व्यक्ती होती.

  • Que: कोणत्या विमानाचा अपघात झाला होता?

    Ans: हा अपघात LANSA फ्लाइट 508 या विमानाचा होता, जे पेरूमधील लीमा येथून पुकाल्पाकडे जात होते.

  • Que: अपघातानंतर जुलियासमोर कोणती संकटे होती?

    Ans: तिला गंभीर जखमा झाल्या होत्या, डोळे सुजले होते, अंधूक दिसत होते आणि ती एकटी अमेझॉनच्या दाट जंगलात अडकली होती. विषारी साप, हिंस्त्र प्राणी, कीटक, संसर्ग आणि अन्न-पाण्याचा अभाव ही मोठी आव्हाने होती.

Web Title: Plane crashes from 10000 feet in amazon jungle thrilling story of plane crash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 02:08 PM

Topics:  

  • Accident
  • amazon

संबंधित बातम्या

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल
1

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…
2

धुक्याने केला गेम! ‘या’ Eastern Expressway वर वाहनांची एकमेकांना भीषण टक्कर; जखमींची संख्या…

दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 
3

दक्षिण आफ्रिकेत मोठी दुर्घटना! हिंदू मंदिर कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू 

Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू
4

Accident News : अरुणाचल प्रदेशात भीषण अपघात, ट्रक दरीत कोसळून 22 कामगारांचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.