(फोटो सौजन्य – Pinterest)
4 युगांची कथा दडलीये या मंदिरात, 3 स्तंभ पडले आता उरलाय कलियुगचा स्तंभ, खाली पडताच…
पुनीत जिंदल यांचा ‘नो-प्लान ट्रॅव्हल रूल’
पुनीत जिंदल सांगतात की ते कधीही आधी ठरवून एखाद्या शहराची किंवा देशाची तिकीट बुकिंग करत नाहीत. ते थेट Google Flights उघडतात आणि त्या क्षणी जिथे सर्वात स्वस्त फ्लाइट मिळते, तिथेच जाण्याचा निर्णय घेतात. त्यांच्या मते, “स्वस्त फ्लाइट दिसली की लगेच निघा. प्लॅन कराल तर प्रवास हमखास महाग होतो.”
फक्त 14,000 रुपयांत इंटरनॅशनल ट्रिप
पुनीत यांनी सांगितलेला एक अनुभव खूपच रंजक आहे. एकदा त्यांना काश्मीरची ये-जा तिकीट फक्त 4,500 रुपयांत मिळाली आणि त्यांनी लगेच ट्रिप केली. दुसऱ्या वेळी पुण्याची फ्लाइट 16,000 रुपयांची होती, पण त्याच वेळी कझाकस्तानमधील अल्माटीची राउंड ट्रिप फक्त 14,000 रुपयांत मिळाली. मग काय, त्यांनी थेट इंटरनॅशनल ट्रिपच केली. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी फक्त 600-700 रुपयांत हॉस्टल घेतलं, ज्यात जेवणाचाही समावेश होता.
स्वस्तात काश्मीर, बाली आणि बँकॉक
पुनीत यांना एकदा 6,500 ते 7,000 रुपयांत व्हिएतनामची फ्लाइट मिळाली आणि ते लगेच रवाना झाले. व्हिएतनाममध्ये असतानाच त्यांनी पुन्हा Google Flights वापरलं आणि बालीसाठी फक्त 7,000 रुपयांची फ्लाइट मिळाली. भारतातून बालीला जाण्यासाठी साधारणपणे 30-35 हजार रुपये खर्च येतो, पण त्यांनी हा प्रवास अवघ्या 7,000 रुपयांत केला. आणखी एकदा ते घरी बसून मित्रासोबत सहज सर्च करत होते, तेव्हा अचानक 8,000 रुपयांची बँकॉक फ्लाइट दिसली आणि त्यांनी लगेच बॅग भरून प्रवासाला सुरुवात केली.
पुनीत जिंदल यांचा ट्रॅव्हल मंत्र
पुनीत जिंदल म्हणतात की प्रवासासाठी कोणाची वाट पाहू नका. सोलो म्हणजेच एकट्याने प्रवास करा. त्यांच्या मते, एकट्याने फिरताना इतकी नवीन माणसं भेटतात, इतके अनुभव मिळतात की ते कोणत्याही डिग्री किंवा डिप्लोमापेक्षा जास्त शिकवण देतात.
भारतातील एक असे मंदिर जे दिवसातून दोनदा होत गायब, फक्त दर्शन घेऊनच इथे मिळतो मोक्ष
स्वस्तात ट्रिप करायची असेल तर काय करावे?






